शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयात मृत्यूचा थरार! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट; १८ मजुरांचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 23:55 IST

मेघालयमधील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात तब्बल १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

ईशान्येकडील मेघालय राज्यातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात तब्बल १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून खाणीमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? 

मेघालयमधील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू भागात ही घटना घडली. पोलीस महासंचालक आय. नोंगरंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत स्फोट झाला तेव्हा अनेक मजूर आत काम करत होते. बचाव पथकाच्या हाती आतापर्यंत १६ मृतदेह लागले असून मृतांचा एकूण आकडा १८ वर पोहोचला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, मजुरांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी राजधानी शिलाँगला हलवण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, मदतीची घोषणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "मेघालयातील दुर्घटनेने मन व्यथित झाले आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे," अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अवैध खाणकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने २०१४ मध्ये मेघालयातील रेट होल खाणींवर बंदी घातली होती. असे असतानाही, ही खाण अवैधरित्या चालवली जात होती का? या प्रश्नावर बोलताना पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी "प्राथमिक पाहणीत ही खाण अवैध असल्याचेच वाटते," असे सांगितले. बंदी असतानाही अशा जीवघेण्या खाणी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले गेले असण्याची शक्यता असल्याने बचाव कार्य अधिक वेगाने राबवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी तैनात असून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Meghalaya Mine Blast: 18 Dead in Illegal Coal Mine

Web Summary : A blast in an illegal Meghalaya coal mine killed 18. PM Modi announced relief. Illegal mining questions arise despite a prior ban.
टॅग्स :AccidentअपघातMining Scamखाण घोटाळा