उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 05:48 IST2026-04-12T05:47:15+5:302026-04-12T05:48:01+5:30

Boat Accident in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात वृंदावन येथे यमुना नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ११वर पोहोचली आहे. शनिवारी शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान आणखी एक मृतदेह सापडल्याने ही संख्या वाढली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

Death toll in boat accident in Uttar Pradesh reaches 11 | उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर

उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर

मथुरा - उत्तर प्रदेशात वृंदावन येथे यमुना नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ११वर पोहोचली आहे. शनिवारी शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान आणखी एक मृतदेह सापडल्याने ही संख्या वाढली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. तसेच अपघातग्रस्त बोटीचा चालक, पॉन्टून पुलाच्या दुरुस्ती कामाच्या कंत्राटदारास अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचे प्रभारी भूदेव प्रसाद यांनी सांगितले की, वृंदावन येथे शुक्रवारी बोट उलटलेल्या ठिकाणापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर देवरा बाबा घाटाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. लुधियानाचा रहिवासी माणिक टंडन (वय ४२) यांचा तो मृतदेह आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी बोट केशी घाटाजवळ पॉन्टून पुलाच्या तरंगत्या ड्रमला धडकली आणि उलटली होती. त्यातील मृत व जखमींपैकी बहुतांश लोक हे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराव आणि दुगरी भागातील आहेत. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जणांना वाचवण्यात आले आहे. 

 

Web Title : उत्तर प्रदेश नाव दुर्घटना: मृतकों की संख्या 11 तक पहुंची

Web Summary : उत्तर प्रदेश के वृंदावन में नाव दुर्घटना में मृतकों की संख्या बढ़कर 11 हो गई है। पर्यटकों को ले जा रही नाव एक पोंटून पुल से टकराकर पलट गई। नाव चालक और पुल मरम्मत ठेकेदार को गिरफ्तार किया गया है। अधिकांश पीड़ित पंजाब से हैं।

Web Title : Uttar Pradesh Boat Tragedy: Death Toll Climbs to 11

Web Summary : The death toll in the Uttar Pradesh boat accident near Vrindavan has risen to 11. The boat, carrying tourists, capsized after hitting a pontoon bridge. The boat driver and the pontoon bridge repair contractor have been arrested. Most victims are from Punjab.