शेतकऱ्याचा मृत्यू; गुन्हे दाखल करा; दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 04:28 IST2020-12-02T04:28:43+5:302020-12-02T04:28:53+5:30
मयत शेतकरी हे लुधियानाच्या खटरा गावचे होते. रविवारी सायंकाळी ते खाली कोसळले

शेतकऱ्याचा मृत्यू; गुन्हे दाखल करा; दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु असताना गज्जन सिंग (५५) या शेतकऱ्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, आंदोलनादरम्यान हरियाणा सरकारकडून पाण्याचा मारा केला जात होता. त्यामुळेच गज्जन सिंग यांचा मृत्यू झाला आहे.
मयत शेतकरी हे लुधियानाच्या खटरा गावचे होते. रविवारी सायंकाळी ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह बहादूरगडच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
गज्जन सिंग यांचे पुतणे हरदीप सिंग हे सोमवारी बहादूरगडमध्ये पोहचले. ते म्हणाले की, या घटनेसाठी हरियाणा आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. वारंवार ओले झाल्यामुळे माझे काका आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी नेत्यांनी मृतावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी हरियाणातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.