शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मद्य व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

कारची धडक : रॉड, दंड्याने मारहाण नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लयात राजू जयस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे उपराजधानीतील मद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ ...


कारची धडक : रॉड, दंड्याने मारहाण
नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लयात राजू जयस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे उपराजधानीतील मद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
आरोपी पप्पू जयस्वाल हा एमआयडीसीत रायफल बार चालवायचा. मंजूर नकाशापेक्षा जास्त आणि चुकीचे बांधकाम केल्यामुळे नासुप्रने २ फेब्रुवारीला रायफल बारचे अतिक्रमण तोडले. तिकडे राजू यांनी पप्पूच्या प्रतिस्पर्धी बार मालकाला व्यवसाय वाढीसाठी मदत केल्याच्या संशयामुळे पप्पू जयस्वाल संतापला. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी ३ च्या सुमारास राजू आपल्या होंडा सिटी कारने एमआयडीसीतून घराकडे जात असताना सेंट झेवियर स्कूलजवळ आरोपी पप्पू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कारला एक्सयूव्हीने (एमएच ३१/ ईए ५६७) जोरदार धडक मारली. धोका लक्षात आल्यामुळे राजू यांनी कारमधून बाहेर निघून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पप्पू, अशोक वाघमारे आणि इतरांनी पाठलाग करून राजूला पकडले आणि त्यांच्यावर रॉड तसेच बेस बॉलच्या दंड्याने (स्टीक) जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर आणि पायावर फटके पडल्यामुळे राजू गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्यामुळे आजूबाजूच्यांनी धाव घेतली. जमावातील काहींनी आरोपींना पकडले. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी जयस्वाल यांना त्यांच्या मित्रांच्या मदतीने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राजू यांच्या डोक्याला चार ते पाच टाके लागल्याची माहिती असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
---
आरोपी कुख्यात गुंड
आरोपी पप्पू आणि अशोक वाघमारे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील अशोक हा नंदनवनमधील कुख्यात गुंड असून, हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे एमआयडीसी पोलीस सांगतात.
----