मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:38 IST2025-08-09T08:37:54+5:302025-08-09T08:38:38+5:30

भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर...!

Dead economy Then whose 7 Percent growth rate is this, President Trump Arvind Panagariya's counterattack | मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार

मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार


नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या ‘मृत अर्थव्यवस्था’ या टीकेला १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.  जर भारताची अर्थव्यवस्था सात टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढत असेल तर ती मृत नसते आणि डॉलरच्या तुलनेत तर आपली वाढ सात टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ‘मृत अर्थव्यवस्थे’ची’ व्याख्या काय आहे, हे मला माहीत नाही. कदाचित मृतदेहही हलू-डुलू शकतात, असे ते म्हणाले.

ईयूसोबत तातडीने व्यापार करार करा
अरविंद पनगढिया यांनी भारताला युरोपीय संघासोबत तातडीने मुक्त व्यापार करार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, एक बाजारपेठ बंद होते, तेव्हा दुसरी बाजारपेठ खुली करावी लागेल. त्यामुळे ईयूसोबत करार पूर्ण करावा, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने अधिक व्यापार करार करायला हवेत आणि निर्यातीसाठी आशियाई बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करायला हवे, तसेच ‘चीनसोबतच्या भूमिकेचा पुन्हा विचार’ करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सोपी असावी : राज्य स्तरावर जमीन-संबंधित सुधारणा करण्याची गरज आहे. शहरीकरणाचा विचार करताना उद्योगांसाठी शहरे कशी तयार करायची, याचा विचार करत नाही, असे सांगत त्यांनी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सोपी करण्याची सूचना केली.


ही पाहा भारतीय अर्थव्यवस्था
३.९ ट्रिलियन डॉलर्स सध्याचा जीडीपी. जगात चौथ्या स्थानी
६.५% जीडीपी दर 
१६% एवढे योगदान भारताचे जगाच्या अर्थव्यवस्थेत.

भारताने यापेक्षाही मोठी संकटे पाहिली
अरविंद पनगढिया म्हणाले की, आपल्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. सध्याची परिस्थिती काही प्रमाणात १९९१ च्या संकटासारखी आहे. अमेरिकेने लादलेल्या मोठ्या शुल्कांमुळे हे संकट आले आहे. 

ते पुढे म्हणाले की, भारताने यापेक्षा मोठी संकटे पाहिली आहेत आणि सध्याची अर्थव्यवस्था ‘मजबूत’ आहे. व्यापारसंकटाच्या काळात पुरवठा साखळी सर्वांत चांगला फायदा कुठे मिळतो त्यानुसार बदलते. 

बाजारपेठांमध्ये नफा कमावण्याचा उद्देश खूप मोठा असतो आणि उद्योजक इतके हुशार असतात की, ते पुरवठा साखळी (सप्लाय चेन) लगेच बदलतात, असेही यावेळी अरविंद पनगढिया म्हणाले.

Web Title: Dead economy Then whose 7 Percent growth rate is this, President Trump Arvind Panagariya's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.