शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

तो दिवस, ते वर्ष... जयंत पाटलांनी जागवल्या विश्वविजयाच्या 'पवार'फुल्ल आठवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 11:39 AM

भारतीय संघाच्या विश्वविजयाची महाराष्ट्रालासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्रपुत्र सचिन तेंडुलकरचं स्वप्न पू्र्ण झालं होतं, आणि यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे शरद पवार होते.

ठळक मुद्देविश्वचषक 2011 च्या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज केले. कपिल देव यांनी 1983 मध्ये उंचावलेल्या वर्ल्डकपनंतर भारताने 2011 मध्येच विश्वविजयाचा जल्लोष साजरा केला होता

मुंबई - टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लगावलेला उत्तुंग षटकार आणि देशभरात एकच जल्लोष झाला. आजच्याचदिवशी 10 वर्षांपूर्वी कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी विश्वचषक उंचावला आणि देशभरात दिवाळी साजरी झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 10 वर्षांपूर्वीच्या विश्वविजयाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 

विश्वचषक 2011 च्या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज केले. कपिल देव यांनी 1983 मध्ये उंचावलेल्या वर्ल्डकपनंतर भारताने 2011 मध्येच विश्वविजयाचा जल्लोष साजरा केला होता. आजच्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल 2011 रोजी हा आनंद साजरा करण्यात आला होता. त्यामुळे, या विजयी उत्सावाचे 10 वर्षांनीही सेलिब्रेशन होत आहे. त्यामुळेच, अनेक क्रिकेटर्स या विजयाच्या आठवणी जागवत आहेत.   

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हा कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगून होम क्वारंटाईन होत असल्याचे सचिननं सांगितले होते. पण, शुक्रवारी त्यानं एक ट्विट करून वैद्यकिय सल्ल्यानुसार आता हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होत असल्याची माहिती दिली. तसेच, रुग्णालयात असतानाही, वर्ल्ड कप विजयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा, असेही सचिनने ट्विटमध्ये म्हटलंय. 

भारतीय संघाच्या विश्वविजयाची महाराष्ट्रालासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्रपुत्र सचिन तेंडुलकरचं स्वप्न पू्र्ण झालं होतं, आणि यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे शरद पवार होते. त्यामुळे, या दोन मराठमोळ्या दिग्गजांनी वर्ल्डकप उंचावला होता. जयंत पाटील यांनीही शरद पवारांनी वर्ल्डकप उंचावलेला फोटो शेअर केला आहे. विश्वविजयाच्या या आठवणी सदासर्वकाळ आपल्यासोबत राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटलंय. मीही त्या रात्रीचा साक्षीदार होतो, जेव्हा मास्टरब्लास्टर सचिनला विराटने मैदानावरच आपल्या खांद्यावर उचलले होते. या धोनीच्या टीमचं आणि भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन पाहण्याचा भाग्य आपल्याला लागलं, असेही पाटील यांनी म्हटलयं.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलTeam Indiaभारतीय क्रिकेट संघSharad Pawarशरद पवारSachin Tendulkarसचिन तेंडुलकर