शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दाऊदला आणणार की एअर स्ट्राईकचे पुरावे देणार?; मोदींच्या ट्विटनंतर आला तर्कवितर्कांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याबाबत माध्यमांसह लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी 11.30 मिनिटांनी एक ट्विट केलं. यामध्ये 11.45 ते 12 दरम्यान मी देशासाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येणार असल्याचं मोदी यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याबाबत माध्यमांसह लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. 

या ट्विटला धरून काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मोदी यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले.   नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार असल्याचं ओमर अब्दुल्लांकडून मोदींना टोला लगावण्यात आला.

इतकचं नव्हे तर सोशल मिडीयातही नेटीझन्सकडून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताने पकडलं अशी घोषणा मोदी करतील असाही ट्रेंड सुरु होता. काही जणांनी तर हाफीद सईद, मसूद अजहरला पकडण्यात भारताला यश आलं अशी घोषणा मोदी करतील असा दावा करण्यात आला. तर काश्मीरमधील कलम 370 हटविण्याबाबत नरेंद्र मोदी ऐतिहासिक घोषणा करतील असंही सांगण्यात आलं. तर काहींनी मोदी एअर स्टाईकचे पुरावे देणार असल्याचं सांगितले.

 

काही ट्विटर युजर्सकडून मोदींच्या या ट्विटची खिल्ली उडवत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी नोटबंदीचा निर्णय करतील असं सांगितलं तर एकाने 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यात जमा होतील असं सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर प्रत्यक्षात पंतप्रधान देशाला संबोधित करेपर्यंत ट्विटरवर अक्षरश: धुमाकूळ माजला होता.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी सरकार दाऊदला पकडून भारतात आणण्यात येईल अशी घोषणा करतील तसेच पाकिस्तानसोबत छोटं युद्ध करण्यात येईल असा आरोपही केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकी कोणती घोषणा करतील याबाबत अनेकांना उत्सुकता होती. 

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कल्पना नसताना देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. रात्री 8 च्या सुमारास मोदी यांनी देशवासियांनी संबोधित करताना मध्यरात्री 12 पासून देशात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बंद करण्यात येतील. अशा नोटा बाजारात चालणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबाबत नेटीझन्सकडून अनेक चर्चा करण्यात येत होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरDawood Ibrahimदाऊद इब्राहिमRaj Thackerayराज ठाकरेDemonetisationनिश्चलनीकरण