शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद करणार होता आत्मसमर्पण

By admin | Updated: May 3, 2015 06:09 IST

मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार झाला होता, पण सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला,

नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार झाला होता, पण सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला, असा सनसनाटी दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन उपमहानिरीक्षक नीरजकुमार यांनी केला. मात्र, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर चहुबाजुंनी टीका झाल्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेतले. मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर दीड वर्षाने दाऊदने आत्मसमर्पणाचा प्रस्ताव दिला  होता, असा दावा करून नीरजकुमार म्हणाले, जून १९९४ मध्ये त्यांचे तीनदा दाऊदशी बोलणे झाले होते. आत्मसमर्पणाची कल्पना दाऊदच्या मनात होती. परंतु आत्मसमर्पणानंतर विरोधक आपला जीव घेतील, असे भय त्याला वाटत होते. यावर तुझे संरक्षण करणे ही सीबीआयची जबाबदारी आहे अशी ग्वाही आपण त्याला दिली होती. मात्र बोलणी पुढल्या टप्प्यात जाण्यापूर्वीच सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. नीरजकुमार यांच्या या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाली. जुलै २०१३ साली दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले कुमार १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत एकापाठोपाठ एक झालेल्या १२ बॉम्बस्फोटांची चौकशी करणाऱ्या सीबीआय चमूचे प्रमुख होते. नीरजकुमार यांनी आपले वक्तव्य काही तासातच मागे घेतले. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. दाऊद आत्मसमर्पण करणार होता असे मी बोललोच नाही.नीरजकुमार यांचा दावा सीबीआयचे तत्कालीन महासंचालक के. विजय रामाराव यांनी फेटाळला आहे. दाऊद आत्मसमर्पण करणार होता, या वृत्तात काहीएक तथ्य नाही. परंतु तो नीरजकुमार यांच्या संपर्कात होता काय, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.