ह्दयस्पर्शी! सासूची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूनांनी दिला तिरडीला खांदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:11 IST2022-12-23T15:11:22+5:302022-12-23T15:11:50+5:30
पाच वर्षे सासू फुलपती यांना चालता येत नसल्याने त्या खाटेवर राहायचे. फुलपतीच्या सुनांनी सासूला कधीच अस्वस्थ वाटू दिले नाही.

ह्दयस्पर्शी! सासूची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूनांनी दिला तिरडीला खांदा
सोनीपत - प्रथा परंपरेनुसार आतापर्यंत फक्त मुलगे आणि मुलींनीच आई-वडिलांच्या तिरडीला खांदा दिला होता, परंतु सोनीपतच्या बौद्ध विहार इथं १०५ वर्षांच्या फुलपती यांना त्यांच्या सुनांनी खांदा दिला. फुलपतीला पाच मुलगे, तीन मुली, नऊ नातू आणि नऊ नातवंडे आहेत. आजारपणामुळे फूलपती पाच वर्षे खाटेवर खिळल्या होत्या. घरच्या सूनच फुलपतीची सेवा करत होत्या.
सुनांच्या सेवेने खुश असलेल्या सासू फुलपतीची शेवटची इच्छा होती की, जेव्हा सूनांनी प्रत्येक क्षण माझ्यासोबत घालवला. माझी सेवा केली त्यामुळे तेव्हा माझ्यावरील अंतिम विधीही त्याच पार पडतील. मुलांनी-सुनांनी फूलपतीची शेवटची इच्छा मान्य केली आणि त्याला खांदा देऊन सर्व विधी पार पाडले. मुर्थल रोड येथील बौद्ध विहार कॉलनीत राहणारे फूलपती यांची दोन मुले हरियाणा सरकारमध्ये तर दोन मुले केंद्र सरकारमध्ये अधिकारी आहेत. धाकटा मुलगा शेती सांभाळतो.
पाच वर्षे सासू फुलपती यांना चालता येत नसल्याने त्या खाटेवर राहायचे. फुलपतीच्या सुनांनी सासूला कधीच अस्वस्थ वाटू दिले नाही. प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत राहून त्याची सेवा केली. सुनांच्या सेवेने प्रभावित होऊन त्यांनी आपल्या मुलाकडे इच्छा व्यक्त केली की, माझ्या अखेरच्या विधी सूनांनी करावा.
बुधवारी रात्री उशिरा फुलपती यांनी अखेरचा श्वास घेतला. हरियाणा रोडवेजमधील मुख्य निरीक्षक पदावरून निवृत्त झालेला त्यांचा मधला मुलगा रोहतास कुमार याने आईची शेवटची इच्छा पूर्ण करत सुनांना खांदा देण्यास सांगितले. सेक्टर-15 स्मशानभूमीत फुलपतींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरियाणा रोडवेजचे कर्मचारी, सेवानिवृत्त जिल्हा उत्पादन शुल्क आणि कर अधिकारी आर के पावरिया, सेवानिवृत्त जिल्हा महसूल अधिकारी सुरेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.