मेट्रिमोनियल साईटवरून तरुणीशी ओळख, व्हिडीओ चॅट आणि ब्लॅकमेलिंग, लुटले १.१४ कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:27 PM2023-08-02T14:27:56+5:302023-08-02T14:28:31+5:30

Matrimonial Fraud: लग्नासाठी आपल्या आवडीचा जोडीदार शोधण्यासाठी अनेकजण मेट्रिमोनियल साईटची मदत घेतात. या साईट्सवर चॅटिंगपासून व्हिडीओ कॉलपर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात.  मात्र एका ४१ वर्षीय इंजिनिअरला या प्लॅटफॉर्मवर लग्नासाठी मुलगी पाहणं चांगलंच महाग पडलं.

Dating, video chat and blackmailing young woman through matrimonial Sites, looted Rs 1.14 crore | मेट्रिमोनियल साईटवरून तरुणीशी ओळख, व्हिडीओ चॅट आणि ब्लॅकमेलिंग, लुटले १.१४ कोटी रुपये 

मेट्रिमोनियल साईटवरून तरुणीशी ओळख, व्हिडीओ चॅट आणि ब्लॅकमेलिंग, लुटले १.१४ कोटी रुपये 

googlenewsNext

लग्नासाठी आपल्या आवडीचा जोडीदार शोधण्यासाठी अनेकजण मेट्रिमोनियल साईटची मदत घेतात. या साईट्सवर चॅटिंगपासून व्हिडीओ कॉलपर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात.  मात्र एका ४१ वर्षीय इंजिनिअरला या प्लॅटफॉर्मवर लग्नासाठी मुलगी पाहणं चांगलंच महाग पडलं. या प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या एका महिलेने आपली संस्कारी ओळख दाखवली. त्यानंतर त्या इंजिनिअरसोबत व्हिडीओ चॅट करत ब्लॅकमेलिंगला सुरुवात केली आणि त्याच्याकडून चब्बल १.१ कोटी रुपये उकळले.

काही कामा निमित्त हा इंजिनियर ब्रिटनमधून बंगळुरू येथे आला होता. त्याला लग्न करायचं असल्याने त्याने एका मेट्रोमोनियल साईटवर नाव नोंदवले. त्यानंतर या साईटवरून तो एका महिलेला भेटला. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. नियमित बोलणं सुरू झालं. त्यानंतर या महिलेने मी माझ्या आईसोबत राहते. तसेच माझे वडील नाही आहेत, असं सांगितलं. 

या महिलेने त्याच्यासमोर चांगलं वर्तन दाखवलं. तिने सुरुवातीला आईच्या उपचारांसाठी १५०० रुपये उधार मागितले. त्यानंतर तिने एका व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल केला. तसेच हा कॉल गुपचूपपणे रेकॉर्ड केला. मात्र दोघांमधील व्हॉट्सअॅप कॉलमध्य़े नेमकं काय बोलणं झालं, याची माहिती समोर आलेली नाही.

व्हिडीओ कॉलनंतर या महिलेने त्या इंजिनिअर तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर पैसे दिले नाहीत तर त्या व्हिडीओंचा वापर बदनाम करण्यासाठी करेन, असे तिने सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने तिच्या खात्यामध्ये तब्बल १.१४ कोटी रुपये जमा केले.

यानंतरही या महिलेने ब्लॅकमेल करणे सुरू ठेवले. त्यानंतर या व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे. या महिलेने बनावट आयडी आणि नावाने प्रोफाईल तयार केली होती. डीसीपी एस. गिरीश यांनी सांगितले की, पोलिसांनी ८४ लाख रुपये गोठवले आहेत. तर आरोपी महिलेने आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च केले आहेत.  

Web Title: Dating, video chat and blackmailing young woman through matrimonial Sites, looted Rs 1.14 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.