शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दर्डा सुधारित महत्त्वाचे.....

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

दर्डा सुधारित महत्त्वाचे.....(चार बातम्या एकत्रित केल्या आहेत)धान्याचा किमान आधारभावकिरकोळ बाजारदरापेक्षाही कमीराज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्र्यांची माहितीनवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षासाठी गहू, तांदूळ, तूर, उडीद, मूग, चणा आणि मसूर डाळीसारख्या धान्याचे किमान आधारभाव निश्चित केले असून, ते किरकोळ बाजारदरापेक्षा कितीतरी कमी म्हणजे निम्म्यापेक्षा ...


दर्डा सुधारित महत्त्वाचे.....
(चार बातम्या एकत्रित केल्या आहेत)
धान्याचा किमान आधारभाव
किरकोळ बाजारदरापेक्षाही कमी
राज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षासाठी गहू, तांदूळ, तूर, उडीद, मूग, चणा आणि मसूर डाळीसारख्या धान्याचे किमान आधारभाव निश्चित केले असून, ते किरकोळ बाजारदरापेक्षा कितीतरी कमी म्हणजे निम्म्यापेक्षा किंचित जास्त आहे, अशी धक्कादायक माहिती राज्यसभेत कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारिया यांच्या लेखी उत्तरातून मिळाली आहे.
खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नावर कुंडारिया यांनी आकडेवारी सादर केली. त्यानुसार गव्हाचे किरकोळ भाव २२१२, तांदळाचे २८१५, तूर डाळीचे ७५१० रुपये प्रति क्विंटल आहे. सरकारी आकडेवारीनुसार उडीद, मूग, चणा आणि मसूर (लेंटिल) यांचा किरकोळ दर अनुक्रमे ७५७१, ९३६४, ४५६४ आणि ७१०५ प्रति क्विंटल असून, त्यांचा किमान आधारभाव ४३५०, ४६००, ३१७५, ३०७५ रुपये प्रति क्विंटल घोषित करण्यात आला आहे. धान्याचा किमान आधारभाव किरकोळ बाजारदरापेक्षा कमी आहे काय? शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च पाहता सरकार आणखी २० टक्के अतिरिक्त रक्कम आकारत किमान आधारभाव निश्चित करणार काय? सरकार चालू हंगामासाठी धान्याचे किमान आधारभाव वाढविणार काय? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
त्यावर कुंडारिया म्हणाले की, कृषी उत्पादनखर्च आणि दर आयोगाच्या शिफारशी, राज्य सरकार, केंद्रीय मंत्रालय आणि विविध विभागांचे जाणून घेतलेले मत तसेच अन्य घटकांच्या आधारे किमान आधारभाव निश्चित केला जातो. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, सामान्य दरावर पडणारा प्रभाव आणि ग्राहकांकडून होणार्‍या वापरावर होणारा परिणाम, आदी अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा विचार केला जातो.

रेल्वेच्या रिक्त जमिनीचा
व्यावसायिक वापर होणार
महाराष्ट्रात रेल्वेची जमीन रिक्त असलेल्या आठ स्थानांचा व्यावसायिक वापर सुरू होणार आहे. लेखी उत्तरात रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. या स्थानांचा व्यावसायिक वापरासाठी विकास करण्याची जबाबदारी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाकडे (आरएलडीए)सोपविण्यात आली आहे.
रेल्वेच्या रिक्त आणि उपयोगात नसलेल्या जमिनीच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली काय? असेल तर रेल्वेची किती जमीन निवडण्यात आली. अशाप्रकारच्या किती प्रकल्पांवर महाराष्ट्रात काम सुरू आहे? हे जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली. रेल्वेला भावी प्रकल्पांकरिता तातडीने आवश्यकता नसलेल्या रिक्त जमिनीचा विकास करण्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत रेल्वेच्या ९१६ हेक्टर जमिनीपैकी १०२ स्थानांचा व्यावसायिक वापर केला जाणार असून, ही जमीन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे. त्यापैकी चार स्थानांसाठी विकासक नियुक्त करण्यात आले आहेत. अद्याप कोणत्याही स्थानावर काम सुरू झालेले नाही. महाराष्ट्रात आठ स्थानांचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग केला जाणार असून, जबाबदारी प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे, असे सिन्हा यांनी उत्तरात सांगितले.
कचरा फेकणे गुन्हा ठरविण्याचा
अधिकार राज्यसरकारकडे
कचरा फेकण्याची कृती गुन्हा ठरविण्याबाबत केंद्र सरकारने हात वर केले आहे. त्यासाठी सर्व अधिकार राज्यसरकारांकडे आहे. स्वच्छता हा मुद्दाही राज्य सरकारांच्या अखत्यारितील आहे, असे पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी एका उत्तरात नमूद केले. ठोस कचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून, कचर्‍याच्या पुनर्वापराला(रिसायकलिंग) प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर आहे, असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मोहिमेनुसार (ग्रामीण) कचर्‍याच्या पुनर्वापरावर भर देतानाच कचरा फेकणे हा गुन्हा ठरविणार आहे काय? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
गंगेच्या स्वच्छ प्रवाहासाठी
कायदा- उमा भारती
गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासह तिचा प्रवाह निरंतर राहावा, यासाठी गंगा नदी कायदा आणण्याचा विचार असल्याचे जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी नमूद केले. प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने ७ फेब्रुवारी २०१४ रोजी आंतरमंत्रालय समितीची स्थापना केली आहे, असे त्या म्हणाल्या. गंगा नदीचा प्रवाह अखंड राहावा, यासाठी सरकार कायदा आणणार काय? वेगवेगळ्या ठिकाणी गंगा नदीला येऊन मिळणार्‍या उपनद्यांची सफाई केली जाणार काय? तसे असेल तर यमुना नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाणार आहेत? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.