दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस

By देवेश फडके | Published: February 11, 2021 09:20 AM2021-02-11T09:20:05+5:302021-02-11T09:23:01+5:30

नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले, अशी माहिती पोलिसांकडून यावेळी देण्यात आली.

dantewada police says 13 Naxals surrendered as part of Lon Varratu campaign | दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस

प्रातिनिधिक छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देदंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणनक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे अभियानगेल्या ८ महिन्यात ३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर बुधवारी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १३ जणांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, तीन जणांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस होते. (Dantewada Police says 13 Naxals surrendered as part of Lon Varratu campaign) 

दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 

गेल्या काही महिन्यांत नक्षलवादी उल्लेखनीय संख्येत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतताना दिसत आहेत. समर्पण करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी तिघांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या सर्वांवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, अशा प्रकारचे गुन्हे आहेत. 

गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारी धोरणानुसार, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी 'लोन वर्राटू' अभियानासंदर्भातील पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले आहेत. यामुळे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यासाठी संपर्क साधू शकतील. लोन वर्राटू याचा स्थानिक गोंडी भाषेतील अर्थ 'आपल्या गावी परत या' असा होतो. 

गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोन वर्राटू नामक अभियान सुरू करण्यात आले आहे. हिंसाचार आणि शस्त्रास्त्र सोडून आपल्या गावी परत येण्याचे आवाहन पोलिसांकडून नक्षलवाद्यांना करण्यात आले आहे, असेही पल्लव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: dantewada police says 13 Naxals surrendered as part of Lon Varratu campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.