गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:18 AM2021-02-11T01:18:00+5:302021-02-11T07:12:11+5:30

सिलिंडरचा साठा, वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून अधिकृतपणेच खरेदी करावे.

Gas cylinders are dangerous precautions to be taken while using cylinders | गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

Next

मुंबई : मुंबईतील बहुतांशी घटना या सिलिंडर स्फोटाशी निगडित असतात. अशा घटना घडू नयेत म्हणून मुंबई महापालिका सिलिंडरच्या वापराबाबत सूचना करत असते. साठा करू नका, असे आवाहन करत असते.  याकडे कानाडोळा केला जातो. परिणामी, लालबाग किंवा अंधेरीसारखी एखादी दुर्घटना घडते आणि नाहक बळी जातात. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिका आणि अग्निशमन दल याबाबत जनजागृतीदेखील करत असते.  केवळ निष्काळजीपणा केल्याने अशा दुर्घटना घडत असतात.

सिलिंडरचा साठा, वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून अधिकृतपणेच खरेदी करावे. सिलिंडर घेतानाच लिकेज नसल्याची खातरजमा गॅस कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून करवून घ्यावी. गॅस लिकेजची खातरजमा करूनच गॅस सिलिंडर देणे हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीलादेखील बंधनकारक आहे, याची आवर्जून नोंद घ्यावी. सिलिंडर घेताना लिकेज तपासणी करतेवेळी लिकेज असल्याचे लक्षात आल्यास लगेचच सिलिंडर बदलून घ्यावा, अशा सूचना मुंबई महापालिका सतत करत असते. 

गॅसगळती : काय करावे?
गळती होत असल्यास शटऑफ व्हॉल्व / रेग्युलेटर बंद करावे.
दरवाजे-खिडक्या उघडाव्यात,कोणतेही विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा चालू करू नये.
शक्य असल्यास सिलिंडर जमिनीवरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवावा, गळती झाली असेल तेथून बाहेर पडून सुरक्षित जागी जावे, गळतीबद्दल गॅस कंपनीला व अग्निशमन दलास कळवावे.

काय केले पाहिजे?
सिलिंडरचा साठा करताना, वापरताना ते बंदिस्त जागी ठेवू नयेत. सिलिंडर आडवे ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
सिलिंडर आडवे ठेवू नयेत. सिलिंडरचा साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावलेली असणे आवश्यक आहे. सिलिंडरजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये. गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना अधिकृत व्यक्तीकडूनच करावी.
एखादी बाब खराब आढळल्यास ती दुरुस्त करण्याऐवजी नवीन घ्यावी व तंत्रज्ञाच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करावी.

गॅस लिकेज डिटेक्टर : काय करावे?
गॅसगळती स्वयंचलित पद्धतीने शोधून त्याची सूचना देणारे अत्याधुनिक  डिटेक्टर बसवून घ्यावे.
परवानगीनुसार गॅस सिलिंडरचा साठा असलेल्या ठिकाणी, गॅस शेगडीच्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने गॅस लिकेज डिटेक्टर बसवावे.

Web Title: Gas cylinders are dangerous precautions to be taken while using cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.