ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:49 IST2020-05-27T22:48:00+5:302020-05-27T22:49:16+5:30
आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला.

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली
नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात कित्येक संवेदनशील घटना घडल्या आहेत. कित्येक घटनांनी डोळ्यात पाणी आणलंय, तर अनेक घटनांनी काळजाचं पाणी-पाणी झालंय. बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावरील एका दृश्याने सोशल मीडिया भावुक झाला असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तहान-भुकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईला तिचा चिमुरडा उठवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मृतदेहासोबत खेळताना दिसतोय. बिहारमधील या चिमुकल्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पुढे आले आहेत. मृत महिलेच्या मुलांच्या नावे ५-५ लाख रुपयांची एफडी करणार असल्याचे यादव यांनी म्हटले.
आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. या आईचा मृतदेह बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. त्यावेळी, तिचा चिमुकला आईला उठविण्याचा प्रयत्न करतोय. आईचा पदर आपल्या हातात घेऊन तो खेळतोय. कारण, आपली आई देवाघरी गेलीय, एवढं समजण्याइतकाही तो मोठा नाही. अतिशय ह्रदद्रावक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन संजय सिंह यांनी रेल्वे मंत्री आणि सरकारवर सडकून टीका केलीय. आता, या व्हिडिओतील चिमुकल्यांची जबाबदारी बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
रेल्वे स्थानकावरील मृत महिलेच नाव अरबिना खातून असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे पती त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे, या महिलेच्या दोन्ही मुलांसाठी ५ लाख रुपयांची मदत तेजस्वी यादव यांनी देऊ केली आहे. सज्ञान होईपर्यंत एफडी स्वरुपात ही रक्कम या मुलांच्या नावे असणार आहे. तसेच, या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि देखभाल करणाऱ्या नातेवाईकास किंवा कुटुंबातील सदस्यास कटिहार जिल्ह्यात नोकरी देण्यात येई, असेही तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे.
मृत महिला अरबिना ख़ातून के पति दो साल पहले उन्हें छोड़ के जा चुके है। तत्काल दोनों बच्चों के लिए हम 5 लाख की आर्थिक मदद कर रहे है ताकि वयस्क होने तक उनके नाम FD रहे। उनकी पढ़ाई का ज़िम्मा और साथ ही देखभाल करने वाले नज़दीकी पारिवारिक सदस्य को गृह ज़िला कटिहार में ही नौकरी देंगे। https://t.co/2XJt8v4RHv
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 27, 2020
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो गरिब आणि मजूर वर्गाला. अनियोजित लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडला कामगार वर्ग, श्रमिक वर्ग आणि हातावरील पोट असलेला गरिब. केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केल्यामुळे हातचं कामही गेलं अन् कोरोनाच्या संकटामुळे गाव गाठण्याला सर्वांनीच प्राधान्य दिलं. श्रमिक मजूरांच्या हालअपेष्टा मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे आल्या. त्यानंतर, सरकारने श्रमिक ट्रेन सुरु करुन मजूरांना घरी पाठविण्याचं काम हाती घेतलं. मात्र, अद्यापही मजूर व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव जात