शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ वीज प्रकल्प महिनाभरात पुन्हा सुरू

By admin | Updated: October 1, 2015 03:02 IST

इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल

नवी दिल्ली: इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल आणि ही वीज रेल्वेला दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी येते केली.दाभोळ प्रकल्पाचे १,९६७ मेवॉ क्षमतेचे वीजनिर्मिती केंद्र व त्यालाच जोडून असलेले वर्षाला ३० लाख टन द्रवरूप नैसर्गिक वायूची हाताळणी करू शकणारे टर्मिनल असे दोन एकजिनसी भाग आहेत.आता दिवाळखोरीत गेलेल्या अमेरिकेच्या एन्रॉन कंपनीने वाऱ्यावर सोडल्यानंतर राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (एनटीपीसी) व गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) यांनी मिळून रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर लि. ही कंपनी स्थापन करून जुलै २००५ पासून हा प्रकल्प ताब्यात घेतला.आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर कंपनीचे विभाजन केले जाईल. यापैकी एक कंपनी रत्नागिरी पॉवर व दुसरी रत्नागिरी गॅस म्हणून ओळखली जाईल. रत्नागिरी पॉवर कंपनी दाभोळ येथील फक्त वीज प्रकल्पाचे संचालन करेल तर गॅस कंपनी गॅस टर्मिनलचा व्यवहार सांभाळेल.रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर लि. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विभाजनासह पुनरुज्जीवनाशी संबंधीत सर्व विषयांना मंजुरी दिली गेली. परिणामी दाभोळ प्रकल्पातून येत्या १ नोव्हेंबरपासून सुरुवातील ५०० मेवॉ वीजनिर्मि ती नक्की सुरु होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.प्रकल्पातून तयार होणारी ही ५०० मेवॉ वीज ४.७९ रु. प्रति युनिट या दराने रेल्वेला पुरविली जाईल, असे सांगून गोयल म्हणाले की, हे शक्य व्हावे यासाठी वीज व गॅसवरील शुल्क व कर माफ करण्यास महाराष्ट्र सरकार तयार झाले आहे. तसेच ‘गेल’ही सवलतीच्या दराने प्रक्रिया व वाहतूक शुल्क आकारून गॅस पुरविमार आहे.रत्नागिरी गॅस कंपनीत एनटीपीसी व ‘गेल’ यांचे समान प्रमाणात भाग भांडवल. महावितरणची तयारी असेल तर त्यांना काही प्रामामात भांडवलात सहभाग.मूळ एकत्रित कंपनीवरील एकूण ७,८०० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ३००० कोटी रुपयांचे कजॅ नव्या रत्नागिरी गॅस कंपनीकडे वर्ग.नवी गॅस कंपनी आणखी २००० कोटी रुपये गुंतवून गॅस टर्मिनलची क्षमता सध्याच्या ३० लाख टनांवरून ५० लाख टन वाढवेल. यासाठी सध्याच्या टर्मिनलसोबत ‘ब्रेकवॉटर’ची व्यवस्था केली जाईल. यामुळे हे टर्मिनल पावसाळ््यातही वापरता येईल.अतिरिक्त गॅस कर्नाटक व गोव्याला खुल्या बाजारात विकला जाईल.