मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:14 IST2025-10-30T09:13:15+5:302025-10-30T09:14:05+5:30
Cyclone Montha: चक्रीवादळामुळे समुद्राच्या तळातील 'ब्रिटिशकालीन' जहाजाचा सांगाडा वर आला

मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात, ओडिशातील गहीरमाथा समुद्री अभयारण्याजवळ एक जुने जहाज बुडालेले आढळले आहे. 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असताना आणि पाणी किनाऱ्याकडे सरकल्यामुळे, हा जहाजाचा सांगाडा नासिरू किनाऱ्याजवळ पाण्याबाहेर दिसू लागला आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाच्या रचनेवरून ते ब्रिटिशकालीन असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. साधारणपणे भरतीच्या वेळी हे अवशेष पाण्याखाली जात आहेत. परंतु चक्रीवादळामुळे समुद्रातील हालचाल वाढल्याने ते आता अधिक स्पष्टपणे बाहेर आले आहेत.
सुमारे दहा वर्षांपूर्वीही या जहाजाचे अवशेष दिसले होते, पण नंतर ते पुन्हा समुद्रात गडप झाले. आता चक्रीवादळामुळे ते पुन्हा वर आले आहेत. हे जहाज कुठून आले, कधी आणि कोणत्या कारणामुळे बुडाले, याबद्दल अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने इतिहासकार आणि पुरातत्व विभागाचे लक्ष वेधून घेतले आहे.