शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

‘मिचाँग’नं घेतले १२ बळी, चेन्नई, आंध्रात थैमान; रेल्वे, विमान वाहतुकीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:03 AM

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला.

अमरावती : ‘मिचाँग’  चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली असली तरी या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूतील चेन्नई आणि जवळील परिसराला बसला. वादळामुळे १०० पेक्षा अधिक ट्रेन, १०० पेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली असून, चेन्नईत पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.    

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला. किनारपट्टीसह अनेक भागांत पावसाने थैमान घातले. रस्ते वाहून गेले, पूरस्थिती निर्माण होऊन हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

२०० टेबल-टेनिसपटू अडकलेविजयवाडा येथे आपले पहिले ११ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन विजेतेपद पटकावणे बंगालची युवा टेबल-टेनिसपटू श्रीओश्री चक्रवर्ती हिच्यासाठी आनंदासोबत दु:खही घेऊन आले. कारण वादळामुळे तेथे अडकून पडलेल्या या खेळाशी संबंधित ३०० लोकांत तिचाही समावेश आहे. तुफान पाऊस झाल्याने ही सगळी मंडळी विजयवाड्यात अडकून पडली आहेत.

५००० कोटींची मदत द्या.वादळाने झालेल्या विनाशाच्या पार्श्वभूमीवर, डीएमके सरकारने ५००० कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीची विनंती केली आहे, असे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांनी मंगळवारी सांगितले. 

बेघर लोकांसाठी अनकापल्ली जिल्ह्यात ५२ पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, तेथे ६० हजारांहून अधिक लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार लाख टन धान्य भिजू नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलली. एलुरू जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली

एनडीआरएफची २९ पथके तैनातचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा व पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण २९ पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चेन्नई शहर व आसपासच्या जलमय भागांत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. पावसामुळे जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळChennaiचेन्नईRainपाऊसfloodपूर