शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
7
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
8
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
9
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
10
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
12
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
13
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
14
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
15
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
16
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
18
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
19
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
20
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:16 IST

Cyclone Ditva Update: श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत.

शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर 'दितवाह' नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी 'प्री-सायक्लोन' अलर्ट जारी केला आहे.

श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. गेल्या २४ तासांत ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या, पुराच्या घटना घडल्या आहेत. ४३,९९१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील शाळा बंद करण्यात आल्या, रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. तर कोलंबो स्टॉक एक्स्चेंजमधील व्यवहारही लवकर थांबवावे लागले आहेत.  श्रीलंकेतील परिस्थिती बिघडल्यास, त्यांची विमाने दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम (Trivandrum) किंवा कोचीन विमानतळांवर वळवली जाऊ शकतात, असेही स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ आता श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून हळूहळू भारताच्या दिशेने सरकत आहे. हवामान विभागाने पुढील १२ तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. चक्रीवादळाचा धोका प्रामुख्याने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनारपट्टीवर आहे. या भागांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyclone 'Ditwah' Heads to India; Sri Lanka Deaths, Alert Issued!

Web Summary : Cyclone 'Ditwah' devastates Sri Lanka, killing 46. India issues pre-cyclone alerts for Tamil Nadu, Andhra Pradesh, Kerala, and Puducherry. The storm is expected to intensify, bringing severe weather to coastal areas. Evacuations and school closures are underway.
टॅग्स :cycloneचक्रीवादळSri Lankaश्रीलंकाweatherहवामान अंदाजIndiaभारत