शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु, डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:52 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकारिणी समितीने आज एक ठराव मंजूर केला असून अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केलीकाँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींसोबत वरिष्ठ नेते हजर होते. काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल. 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मदत असणार आहे. अर्जांची छाननी करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल. 

राहुल गांधी सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असून, अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताच जास्त आहे. जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 5 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 16 डिसेंबरला गरज पडल्यास मतदान घेण्यात येईल. पण सध्या तरी या स्पर्धेत राहुल गांधी एकमेव आहेत. 

 

सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. अंतर्गत निवडणुका पुर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाला वर्षाअखेपर्यंतची मुदत दिली आहे. 

 

आई किंवा मुलगा या दोघांचीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते - मणिशंकर अय्यरयाआधी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाध्यक्षपदाच्या नेमणुकीसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण जाला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी फक्त दोन व्यक्तींची निवड होऊ शकते, आई किंवा मुलगा असे खळबळजनक विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच सोनिया गांधींकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मणिशंकर अय्यर यांनी हे धक्कादायक विधान केले होते. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची गरज असते. फक्त एकच उमेदवार असेल तर, निवडणूक कशी होणार ? असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी विचारला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस