शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयवर निगराणीसाठी सीव्हीसीला बळकटी गंभीर प्रकरणांची दखल : तपासाच्या प्रगतीचा दरमहा आढावा

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नवी दिल्ली : सीबीआयच्या कामकाजावर निगराणीसाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपली यंत्रणा बळकट केली आहे. कोलगेट आणि अन्य संवदेनशील आणि गंभीर स्वरूपाची प्रकरणे पाहता तपासाच्या प्रगतीबाबत सखोल आढावा घेतला जाणार आहे.

नवी दिल्ली : सीबीआयच्या कामकाजावर निगराणीसाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपली यंत्रणा बळकट केली आहे. कोलगेट आणि अन्य संवदेनशील आणि गंभीर स्वरूपाची प्रकरणे पाहता तपासाच्या प्रगतीबाबत सखोल आढावा घेतला जाणार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्याबाबत तपासावरून सीबीआय आणि सीव्हीसीमध्ये मतभेद आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या अनेक प्राथमिक चौकशी(पीई) बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला असून सीव्हीसीचा त्याला विरोध आहे. जी प्रकरणे बंद करायची आहेत, त्याबाबत छाननी करण्याचा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने सीव्हीसीला दिला आहे.
सध्याच्या बदलत्या यंत्रणेत सीव्हीसीला आवश्यक असलेला विशिष्ट डाटा सीबीआयला पुरवावा लागेल. याशिवाय पीईंसह नोंदणीकृत प्रकरणांबाबत दरमहिन्याच्या ७ तारखेपर्यंत स्वतंत्र माहितीही द्यावी लागेल. यापूर्वी अशी कोणतीही कालमर्यादा निश्चित नव्हती. सीबीआयवर निगराणी ठेवणारी यंत्रणा बळकट करण्यासह परिणामकारकता वाढविण्याचा विचार आयोगाकडून बरेच दिवसांपासून सुरू होता.
--------------------
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम
अलीकडच्या काळात प्रकरणांची वाढलेली संवदेनशीलता पहाता आयोगाला निगराणी वाढविणे आवश्यक वाटत आहे. विशेषत: कोळसा खाणपट्ट्यांबाबत नोंदणी झालेल्या पीई आणि क्लोजर रिपोर्टबाबत सवार्ेच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाहता आयोगाने हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणांचा अभ्यास करून छाननी करण्याचे काम पाहता आयोगाला आपली यंत्रणा बळकट करण्यासह सीबीआयवर निगराणी वाढवावी लागत असल्याचे आयोगाने सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
------------------
दरमहा आढावा
नव्या यंत्रणेनुसार आयोगाने दरमहा सीबीआय संचालकांसोबत बैठकी घेत प्रकरणांचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांसह गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांची निवड करीत सीबीआय वेळोवेळी आयोगाला माहिती देणार आहे.