केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:39 IST2025-11-07T15:39:31+5:302025-11-07T15:39:57+5:30
Uttar Pradeh News: उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या रेड्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. येथील सुनगडमधील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याने रेड्याच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना भोजन दिले.

केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या रेड्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. येथील सुनगडमधील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याने रेड्याच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना भोजन दिले. एवढंच नाही तर रेड्याच्या वाढदिवसानिमित्त खास केक कापण्यात आला. तसेच डीजे लावून जोरदार नाचही करण्यात आला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाढदिवसानिमित्त या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या रेड्याला खूप सजवले. तसेच वाढदिवसही दणक्यात साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे या शेतकऱ्याच्या घरी ग्रामस्थांच्या रांगा लागल्या. रेड्याच्या मालकाने आणि ग्रामस्थांनी या रेड्याच्या गळ्यात नोटांचे हार घातले, तसेच गावातून त्याची मिरवणूकही काढली.
यावेळी डीजे लावून ग्रामस्थांनी त्यावर मनसोक्त नाचगी केला. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्रामस्थांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.