मंदिरासारखा केक कापला; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:41 AM2022-11-18T06:41:42+5:302022-11-18T06:42:16+5:30

Kamal Nath: काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या केक कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान  केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.  

Cut a cake like a temple; Criticism of Congress leader Kamal Nath | मंदिरासारखा केक कापला; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर टीका

मंदिरासारखा केक कापला; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर टीका

Next

- अभिलाष खांडेकर
भोपाळ : काँग्रेसचेमध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या केक कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान  केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.  
कमलनाथ यांचा वाढदिवस १८ नोव्हेंबरला आहे; परंतु काही समर्थकांनी त्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून सोमवारी चार दिवस आधीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आकाराचा केक बनविला होता. या केकवर आयसिंग म्हणून हनुमानाची प्रतिमा कोरलेली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावनांचा जराही आदर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

भाजप राईचा पर्वत बनवतोय
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा २० नोव्हेंबरला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. यात्रेच्या तोंडावरच कमलनाथ व काँग्रेसबाबत वाद निर्माण झाला. अर्थात काँग्रेसने तत्काळ याला प्रत्युत्तर दिले. भारत जोडो यात्रेला घाबरून भाजप राईचा पर्वत बनवत असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले. 

Web Title: Cut a cake like a temple; Criticism of Congress leader Kamal Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.