शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

"भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 9:23 AM

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

सुरेश एस डुग्गर

जम्मू/श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरने विकासाची नवी उंची गाठत येथील नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत सांगितले. काँग्रेसने कलम ३७० वरून जम्मू-काश्मीरच्या लोकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीनगर येथे झालेल्या सभेत त्यांनी ६४०० कोटींहून अधिक विकासकामांचे लोकार्पण केले, तसेच एक हजार युवकांना नियुक्तीपत्रही देण्यात आले.

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या मध विक्रेत्याने मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली. याचा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, माझा मित्र नाझीमसोबतचा एक कायम आठवणीत राहणारा सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा, असे मोदींनी म्हटले.

शंकराचार्य पर्वताला केले नमनमोदी यांनी श्रीनगरला येताच सभेपूर्वी शंकराचार्य पर्वतावरील मंदिराला नमस्कार केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक प्रचंड उत्साह दिसला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी हाती फलक घेतले होते.

शहीद सैनिकांना श्रद्धांजली- विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी बदामीबाग छावणी येथील युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. - त्यानंतर ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ कार्यक्रमात त्यांनी ६४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे अनावरण केले.

उपस्थितांची प्रचंड गर्दी; सर्वत्र कडेकोट बंदोबस्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जम्मू-काश्मीरमधील असंख्य लोक श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर उपस्थित होते. त्यांनी मोदींचे मुखवटे घातले होते आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरसह खोऱ्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले होते.................पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाखकंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली.   बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.  आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.

‘गिग वर्कर्स’साठी सुरक्षा कायदाओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा