पत्नीचे अनैतिक संबंध, शेजारी गुपचूप घरात घुसण्याच्या वाटेवर विजेच्या तारांचे जाळे विणले; शेजारी येताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:36 IST2025-02-11T16:36:03+5:302025-02-11T16:36:25+5:30
पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील ५४ वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजुने गुपचूप जात होता. ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली. पतीला यावर विश्वास बसत नव्हता.

पत्नीचे अनैतिक संबंध, शेजारी गुपचूप घरात घुसण्याच्या वाटेवर विजेच्या तारांचे जाळे विणले; शेजारी येताच...
पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची घटना उघडकीस आली आहे. विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकण्यात आला आहे. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे.
पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील ५४ वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजुने गुपचूप जात होता. ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली. पतीला यावर विश्वास बसत नव्हता. आपली पत्नी तशी नाही असे त्याला वाटत होते. एके दिवशी त्याने घराबाहेर गेल्याचे नाटक केले व घराच्या परिसरातच लपून बसला. तेव्हा पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला जाताच तो हळूच मागच्या दरवाजाने घरात घुसला. हे पतीने पाहिले आणि त्याने तत्काळ काही आकांडतांडव करण्याऐवजी त्या शेजाऱ्याचा काटा काढण्याचे ठरविले.
काही दिवसांनी या पतीने मागच्या भागात वाटेवर विजेच्या तारांचा रबर सोलून त्यात वीज प्रवाह सोडून ठेवला. यानंतर पती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला. घरातून पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला गेला, तेव्हा तो नेहमीसारखा मौजमजा करायला, शरीराची भूक भागवायला मागच्या दाराने घरात शिरला. तेव्हा त्याचा पायांना त्या विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाला आणि जागीच तो गतप्राण झाला. ही घटना केरळच्या अलपुझायेथील आहे.
या महिलेला एक मुलगी आणि मुलगाही आहे. त्यांनी आधी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. नंतर पतीनेही केला. परंतू, ती काही केल्या ऐकत नव्हती. यामुळे पतीने हा टोकाचा निर्णय घेतला व कट रचला. या कटात मुलगीही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळे पोलिसांनी पती, पत्नी आणि मुलीला अटक केली आहे.