Crime: मोहालीतील तरुणीवर शिमलामध्ये बलात्कार, माजी मंत्र्याचा निकटवर्तीय BJYMच्या नेत्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 08:35 IST2023-10-05T08:34:58+5:302023-10-05T08:35:20+5:30

Crime News: हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणीने एका तरुणावर आरोप केला आहे. याबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

Crime: Rape of young woman in Mohali, ex-minister's crime against BJYM leader | Crime: मोहालीतील तरुणीवर शिमलामध्ये बलात्कार, माजी मंत्र्याचा निकटवर्तीय BJYMच्या नेत्यावर गुन्हा 

Crime: मोहालीतील तरुणीवर शिमलामध्ये बलात्कार, माजी मंत्र्याचा निकटवर्तीय BJYMच्या नेत्यावर गुन्हा 

हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणीने एका तरुणावर आरोप केला आहे. याबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

शिमला पोलिसांनी पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी नेले असून, या प्रकरणी बालूगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिमला येथील तरुणावर याबाबत आरोप ठेवण्यात आला आहे. सदर तरुण हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी राहिलेला आहे. तसेच तो एका माजी मंत्र्याचा निकटवर्तीय आहे. 

सदर तरुण तरुणी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यामधूनच त्यांची ओळख पटली होती. शिमला पोलिसांनी सांगितले की, एप्रिल २०२३ मध्ये ही घटना घडली होती. तसेच ३ ऑक्टोबर रोजी तरुणीकडून तक्रार देण्यात आली आहे. पीडित तरुणी पंजाबमधील मोहाली येथील रहिवासी आहे. आरोपी तरुण हा छोटा शिमलाच्या खलिनी येथील रहिवासी आहे.

शिमला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालूगंज पोलीस ठाण्यामध्ये ३७६, ३५४, ५०६ आयपीसीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.  

Web Title: Crime: Rape of young woman in Mohali, ex-minister's crime against BJYM leader