Crime: नदीत पार्टी, मौजमस्ती करत असताना वाद पेटला, दोन गटात तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:38 IST2023-05-23T19:38:39+5:302023-05-23T19:38:53+5:30

Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शेकडो लोकांनी नदीतच पार्टीचं आयोजन केलं. यादरम्यान, दोन गटांमध्ये वादावादी झाली.

Crime: Party in the river, while having fun, an argument broke out, two groups clashed | Crime: नदीत पार्टी, मौजमस्ती करत असताना वाद पेटला, दोन गटात तुफान हाणामारी

Crime: नदीत पार्टी, मौजमस्ती करत असताना वाद पेटला, दोन गटात तुफान हाणामारी

छत्तीसगडमधील कोरबा येथे उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शेकडो लोकांनी नदीतच पार्टीचं आयोजन केलं. यादरम्यान, दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मात्र हा वाद का झाला, याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. सध्या कोरबा जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लोक उकाड्याने त्रस्त आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत.
त्यातून काही जणांनी नदीमध्ये पार्टी करण्याची कल्पना शोधून काढली. ही मंडळी सगळ्या तयारीनिशी छुरी येथील झोराघाट. येथे पोहोचले. तिथे डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर सगळे जण नाचत होते. 
मात्र पाण्यात मनसोक्त डुंबत असताना काही तरुण अधिकच जोशात आले. त्यातून वादाला तोंड फुटले. तिथे धक्काबुक्की सुरू झाली. त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिअरच्या   बाटल्या आणि बेल्टनेही त्यांनी एकमेकांना मारले. त्यात काही जण जखमी झाले. त्याबरोबरच झोराघाटमध्येही वाद पेटला आणि गोंधळ माजला.
मात्र पोलीस येण्यापूर्वी बरेचसे लोक तिथून पसार झाले. हसदेवच्या परिसरात असा गोंधळ पहिल्यांदाच झाला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Web Title: Crime: Party in the river, while having fun, an argument broke out, two groups clashed