धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:09 IST2025-07-15T12:08:34+5:302025-07-15T12:09:51+5:30
क्रिकेट खेळत असताना चेंडू दुसऱ्या बाजूला गेला. तो चेंडू शोधण्यासाठी गेल्यानंतर एका बंद असलेल्या घरात एक मानवी सांगाडा दिसला.

धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नामपल्ली येथील एक व्यक्ती त्याचा हरवलेला क्रिकेट बॉल शोधत होता, यावेळा त्याचे लक्ष एका बंद घराच्या खिडकीमध्ये गेले. त्या बंद घरात बरेच मानवी सांगाडे पडलेले त्याला दिसले. ते पाहून त्याला धक्काच बसला. त्याने लगेच ही माहिती पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे घर ७ वर्षांपासून बंद होते. ही घटना समोर आल्यानंतर त्या माणसाने स्वयंपाकघरातील जमिनीकडे पाहिले आणि त्याला एक सांगाडा तोंडावर पडलेला दिसला. हे पाहून तो खूप घाबरला आणि तेथून पळून गेला. या घटनेची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली.
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती त्याच्या बॉलचा शोध घेत असताना एक व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. व्हिडिओमध्ये वाळूने झाकलेल्या जमिनीवर कवट्या आणि हाडे विखुरलेली दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये भांडी विखुरलेली देखील दिसत आहेत आणि घर वर्षानुवर्षे बंद असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नमुने गोळा करुन फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सांगाड्याची ओळख पटेल.
नमुन्यात काय आढळले
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या बंद घराच्या मालकांचे नाव मुनीर खान आहे, त्यांना १० मुले होती. त्यांचा चौथा मुलगा, जो सुमारे ५० वर्षांचा होता, तो या घरात राहत होता. तो अविवाहित होता आणि कदाचित मानसिकदृष्ट्या आजारी होता. हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा कारण त्याच्यावर हल्ला किंवा रक्ताचे कोणतीही खून नाही. स्थानिकांनी सांगितले की, घर ७ वर्षांपासून बंद होते आणि मालक परदेशात राहतो. पोलिसांनी मृतदेह तपासासाठी पाठवला आहे आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.