शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धक्कादायक! कार थांबवून कागदपत्र मागितली म्हणून 'त्याने' पोलिसाचं केलं अपहरण; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 2:16 PM

Crime News : एका व्यक्तीला पोलिसाने अडवलं आणि त्याच्याजवळ गाडीची कागदपत्र मागितली. यावर संतापलेल्या व्यक्तीने थेट पोलीस कर्मचाराचं अपहरण केलं.

नवी दिल्ली - ट्रॅफिक पोलीस हे लोकांनी वाहतुकीचे नियम मोडले की त्यांना दंड ठोठावतात. त्यांची गाडी जप्त करतात. एका व्यक्तीकडे गाडीची कागदपत्र मागणं पोलिसांना आता चांगलंच महागात पडलं आहे. कारण यामुळे पोलिसाचंच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडामध्ये एका व्यक्तील पोलिसाने अडवलं आणि त्याच्याजवळ गाडीची कागदपत्र मागितली. यावर संतापलेल्या व्यक्तीने थेट पोलीस कर्मचाराचं अपहरण केलं. 

पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन त्याला गाडीमधून फिरवून आणत नंतर एका निर्जनस्थळी सोडून देण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे फक्त गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याचं त्या व्यक्तीने अपहरण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा सर्व प्रकार सूरजपूरमध्ये परिसरामध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका वाहतूक पोलीसने नेहमीप्रमाणे गाडीच्या तपासणीदरम्यान एका व्यक्तीला थांबवून गाडीची कागदपत्र मागितली. 

शोरुममधून गाडी चोरी केल्याची शक्यता 

गाडीची कागदपत्र मागणाऱ्या पोलीस हवालदाराला चालक सचिन रावलने कागदपत्र पाहण्यासाठी गाडीत बसा असं सांगितलं. पोलीस कर्मचारी गाडीमध्ये शिरल्यानंतर त्याने वेगाने गाडी सुरू करत मिळेल त्या वाटेने जाण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी गाडी अडवलेली तिथून दहा किलोमीटरवर जाऊन सचिनने या पोलीस कर्मचाऱ्याला गाडीतून खाली धक्का दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गुरुग्राममधील एका शोरुममधून गाडी चोरी केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारेच सचिनला तपासणीसाठी थांबवलं होतं. ही गाडी दोन वर्षांपूर्वी चोरली होती. टेस्ट ड्राइव्हला जातो सांगून एका शोरुममधून ही गाडी लंपास करण्यात आलेली असं म्हटलं आहे.

विरेंद्र यांनी फोन करुन पोलिसांना दिली माहिती 

पोलीस कर्मचारी विरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चालवत असणारी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी चौकशीसाठी थांबली आणि सचिनकडे कागदपत्रं मागितली. त्यावर सचिनने माझ्या मोबाईलमध्ये परिवहनच एप असून तुम्ही गाडीत बसा मी तुम्हाला त्यावर कागदपत्र दाखवतो असं सांगितलं. मात्र विरेंद्र गाडीत बसल्यावर सचिनने सेंट्रलाइज लॉक लावून गाडी दहा किलोमीटरपर्यंत नेली. त्यानंतर विरेंद्र यांनी फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी