Crime news : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, उत्तर प्रदेशचा पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:01 PM2021-09-08T12:01:16+5:302021-09-08T12:02:29+5:30

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवाडीतील निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणे ही उत्तर प्रदेशातील आहेत. सन 2021 च्या पहिल्या 8 महिन्यातील आकडेवारीनुसार आयोगाकडे 19,993 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Crime news : Increase in incidents of violence against women, number one in Uttar Pradesh | Crime news : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, उत्तर प्रदेशचा पहिला नंबर

Crime news : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, उत्तर प्रदेशचा पहिला नंबर

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या महिलांवरील गुन्ह्यांच्या तक्रारीत 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 8 महिन्यांत 974 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

नवी दिल्ली - पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. त्यातच, आता देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत यंदाच्या वर्षी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या महिलांवरील गुन्ह्यांच्या तक्रारीत 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 8 महिन्यांत 974 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवाडीतील निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणे ही उत्तर प्रदेशातील आहेत. सन 2021 च्या पहिल्या 8 महिन्यातील आकडेवारीनुसार आयोगाकडे 19,993 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तुलनेत गतवर्षी 13,618 तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकट्या जुलै महिन्यात 3248 तक्रारी दाखल झाल्या असून 2015 नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे. दरम्यान, आयोगाने जागरुकता अभियान नियमीतपणे राबवले. तसेच, महिलासांठी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. 

आयोगाकडील आकडेवाडीनुसार उत्तर प्रदेश सर्वाधिक तक्रारी असलेले राज्य असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या तुलनेत युपीतील तक्रारींची संख्या 5 पटीने अधिक आहे. 

1,022 प्रकरणात दुष्कर्म व दुष्कर्म करण्याचा प्रयत्न 

जीवन आणि सम्मान      7,836 
घरेलू हिंसा               4,289 
हुंड्यासाठी शोषण          2,923 
सायबर गुन्हा             585 

उत्तर प्रदेशात दिल्लीपेक्षा 5 पट तक्रारी

उत्तर प्रदेश   10,084 
दिल्ली        2,147 
हरियाणा      995 
महाराष्ट्र       974
 

Read in English

Web Title: Crime news : Increase in incidents of violence against women, number one in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.