पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 22:11 IST2025-05-04T22:11:09+5:302025-05-04T22:11:40+5:30
Crime News: पाच लग्नं करून सहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या हरयाणा पोलिसांमधील एका हेड कॉन्स्टेबलवर सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने गंभीर आरोप केले आहेत.

पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
पाच लग्नं करून सहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या हरयाणा पोलिसांमधील एका हेड कॉन्स्टेबलवर सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने गंभीर आरोप केले आहेत. पीडित शिक्षिकेने या हेड कॉन्स्टेबलवर फसवणूक करून लग्न केल्याचा, हुंडा मागितल्याचा आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ही पीडित शिक्षिका बरेली येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल आणि त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पीडित महिलेने २०२३ मध्ये मुझफ्फरनगर येथील राहुल याच्याशी विवाह केला होता. आरोपी राहुल हा गुरुग्राममधील हरयाणा पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल पदावर तैनात आहे. लग्नानंतर पती राहुल हा हुंडा मागू लागला. तसेच मद्यप्राशन करून दररोज मारहाण करू लागल, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेने दीर आणि सासूविरोधातही मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तिने सांगितले की, लग्नानंतर वर्षभराने मला माझ्या पतीने आधीच चार लग्नं केली असल्याचं समजलं. तसेच आता तो सहावं लग्न करण्याची तयारी करत होता. मी विरोध केला, म्हणून त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप पीडितेने केले.
एवढंच नाही तर मारहाणीमुळे माझा गर्भपात झाला, अशा आरोपही या महिलेने केला. दरम्यान, हा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार असून, दोन्ही पक्षांचं समुपदेशन करण्यात आलं होतं. मात्र ते अयशस्वी ठरलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.