कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:57 IST2025-07-03T14:57:15+5:302025-07-03T14:57:28+5:30
तरुण कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर बेशुद्ध पडला आणि त्याला शुद्ध आली ती थेट रुग्णालयात, पाच दिवसांनंतर. शुद्धीवर आल्यावर त्याला समजले की...

कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका विवाहित पुरुषाने आपल्यावर जबरदस्तीने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया (sex change operation) केल्याचा आरोप केला आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला कोल्डड्रिंक देऊन बेशुद्ध केले गेले आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग कापण्यात आले.
पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तो एका नृत्य कार्यक्रमासाठी बदाऊनला जात असताना, त्याला लविना किन्नर आणि तिचा मित्र विकास भेटले. लविनाने त्याला आपल्या घरी नेले, जिथे त्याला कोल्ड्रिंक देण्यात आले. ते कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि त्याला शुद्ध आली ती थेट रुग्णालयात, पाच दिवसांनंतर. शुद्धीवर आल्यावर त्याला समजले की, त्याचे लिंग कापले गेले आहे आणि त्याचे लिंग परिवर्तन झाले आहे. सध्या तो रुग्णालयात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पत्नीने केला धक्कादायक खुलासा!
पीडितेच्या पत्नीने या प्रकरणी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पत्नीने सांगितले की, तिचा नवरा एक विनोदी कलाकार आणि नर्तक आहे आणि तो लविनासोबत पार्ट्यांमध्ये काम करतो. लविना आणि विकास यांनी तिच्या पतीला आमिष दाखवून लविनाच्या घरी नेले. तिथे लविनाने तिच्या पतीच्या पेयात मादक पदार्थ मिसळले. बेशुद्ध अवस्थेत, लविना आणि विकास यांनी तिच्या पतीची जबरदस्तीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली.
डॉक्टरांनी काय सांगितले?
पत्नीने पुढे सांगितले की, पाच दिवसांनी तिच्या पतीला शुद्ध आल्यावर त्याने फोन करून तिला या घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून, काही वैद्यकीय अहवाल मागवले आहेत. डॉ. आर.के. चंदेल यांनी सांगितले की, लिंग बदलाचे प्रकरण समोर आले आहे आणि काही अल्ट्रासाऊंडसह इतर अहवाल मागवण्यात आले आहेत.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सांगितले की, पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लविना किन्नर आणि विकास यांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.