एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:15 IST2025-03-04T21:15:09+5:302025-03-04T21:15:24+5:30
Madhya Pradesh Crime News: Crime News: दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.

एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर...
दुचाकीवरून जाताना स्टंटबाजी करणं, थिल्लर चाळे करणं असले प्रकार अनेक तरुण तरुणींकडून करण्यात आल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, भोपाळमधील व्हीआयपी रोडवर दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. हे चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुचाकीवरील दोन तरुणांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत असलेली तरुणी फरार झाली आहे.
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. व्हीआयपी रोडवर दोन तरुण सुसाट वेगाने दुचाकी चालवत असून, त्यांच्यासोबत बसलेली तरुणी लोकांकडे पाहून अश्लील इशारे करत आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने कोहेफिजा पोलीस ठाण्यामध्ये येऊन दिली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दुचाकीचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्यांविरोधात कलम २८१, १२५, २९६ ३(५) आणि १८४ वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोहेफिजा पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने भरधाव वेगात दुचाकी चालवून स्टंटबाजी करत असलेला दुचाकी चालक रितिक यदुवंशी आणि त्याच्या मागे बसलेला सुमित कुमार यांना अटक केली. मात्र त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी परिवहन विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र या तरुणांसोबत असलेली तरुणी फरार झाली असून, तिचा शोध घेतला जात आहे.