एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:03 PM2024-05-24T16:03:19+5:302024-05-24T16:03:50+5:30

Haryana Crime News: एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी एकाच वेळी हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरिदाबाद येथे घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

Crime News: 6 people of the same family cut the arm vein at the same time, 1 died, 5 serious, the shocking reason came to light  | एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 

एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 

एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी एकाच वेळी हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरिदाबाद येथे घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सावकारी कर्जाच्या पाशात अडकून पैशांच्या देवाणघेवाणीतून ही धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी हे मुंबई आणि दिल्लीतील असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी हाताची नस कापून जीवन संपवण्याच्या केलेल्या प्रयत्नामध्ये कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबात एकूण सहा सदस्य होते. त्यामध्ये पती, पत्नी, मुलगा, सून आणि दोन नातवंडांचा समावेश होता. दरम्यान, जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती गंभीर असून, या प्रकरणी सुमारे १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही संपूर्ण घटना फरीदाबादमधील सेक्टर ३७ येथे घडली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. तर  कुटुंबातील सदस्यांवर फरिदाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Web Title: Crime News: 6 people of the same family cut the arm vein at the same time, 1 died, 5 serious, the shocking reason came to light 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.