खोटे बिल देऊन कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:11+5:302015-02-18T23:54:11+5:30

खोट्या बिलाद्वारे कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

Crime against the accused who collects tax on false bills | खोटे बिल देऊन कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

खोटे बिल देऊन कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

ट्या बिलाद्वारे कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा
नागपूर : बनावट नावाने विक्रीकर खात्याचा नोंदणीकृत व्यापारी असल्याचे कागदपत्र तयार करून इतर व्यापाऱ्यांकडून खोट्या बिलाच्या आधारे कर गोळा करणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मनोज विनोद शर्मा (४२) रा. भवानीनगर पारडी हा महाराष्ट्र विक्रीकर विभाग नागपूरतर्फे नोंदणीकृत व्यापारी आहे. तरीसुद्धा आरोपीने सुभाननगर पारडी येथील आपल्या दयानिधी स्टील ट्रेडर्सचे विक्रीकर विभाग नागपूर यांचे बनावट कागदपत्र तयार करून आणि त्यावर सही करून दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून कर गोळा केला. त्याने शासनाची २० लाखाची फसवणूक केली. विक्रीकर अधिकारी प्रदीप वाघमारे (४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
...............

Web Title: Crime against the accused who collects tax on false bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.