Crime: उद्यानात मित्राला झोडपून, मुलीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 07:25 IST2023-06-30T07:25:19+5:302023-06-30T07:25:42+5:30

Crime: राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील उद्यानात चार नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोघांना अटक केली आहे.

Crime: A girl was gang-raped after beating up her friend in the park | Crime: उद्यानात मित्राला झोडपून, मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime: उद्यानात मित्राला झोडपून, मुलीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली  - राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील उद्यानात चार नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोघांना अटक केली आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही पकडण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. २७) रात्री उशिरा मित्रासोबत घरी जात असलेल्या १६ वर्षीय तरुणीचा चार नराधमांनी विनयभंग केला. तिच्या मित्राने त्यांना विरोध केला असता, हल्लेखोरांनी त्याला मारहाण करून पळवून लावले. यानंतर चौघांनी मिळून मुलीला बळजबरीने उद्यानात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
नराधमांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर  बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ओळख पटली 
चारही आरोपींची ओळख पटली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी फरार असून, त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, बॉबी (१९) आणि राहुल (२०) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही शाहबाद डेअरी परिसरातील आहेत.

Web Title: Crime: A girl was gang-raped after beating up her friend in the park