क्रेडिट कार्डच्या बिलामुळे पतीचे अनैतिक संबंध उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:53 IST2019-07-25T15:53:35+5:302019-07-25T15:53:53+5:30

सासरच्या मंडळींनी महिलेचे न ऐकता पतीचे समर्थन केले.

credit card bill exposes husband's extra-marital affair | क्रेडिट कार्डच्या बिलामुळे पतीचे अनैतिक संबंध उघड!

क्रेडिट कार्डच्या बिलामुळे पतीचे अनैतिक संबंध उघड!

अहमदाबाद : लग्नाच्या तीन दिवसानंतर पतीने आपल्या पत्नीला सांगितले की, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जात आहे. मात्र, पती ऑफिसच्या कामासाठी नाही तर अहमदाबामधील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत होता. याबाबत पत्नीने क्रेडिट कार्ड बिल पाहिले नसते तर तिला आपला पती गर्लफ्रेंडसोबत गेल्याचे कधीच समजले नसते.

अहमदाबाद येथील एक महिला आपल्या पतीचे क्रेडिट कार्ड बिल चेक करत होती. यावेळी तिला एक ट्रांजक्शन केल्याचे हॉटेल बिल मिळाले. त्यानंतर त्या महिलेने आपल्या भावाला यासंबंधी कळवले आणि माहिती काढायला सांगितले. त्यानंतर तिच्या भावाने संबंधीत हॉटेलचा तपास केला. यात असे समजले की त्या महिलेचा पती आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहिला होता.    

दरम्यान, याबाबत या महिलेलने आपल्या सासरच्या मंडळींना सांगितले. तर सासरच्या मंडळींनी महिलेचे न ऐकता पतीचे समर्थन केले. याप्रकरणी या महिलेने पोलिसांत धाव घेत पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सासरची मंडळी त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. 
 

Web Title: credit card bill exposes husband's extra-marital affair