शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मस्त बातमी!... चंद्राचा Digital Map तयार; चांद्रयान मोहिमांसाठी फायदेशीर ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:20 PM

गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे डिजिटल मॅप तयार

ठळक मुद्देसध्या तयार करण्यात आलेला मॅप हा कायमस्वरूपी वापरला जाणार डिजिटल मॅपमध्ये चंद्राच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती

पुणे: अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा  आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे. त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे. अमेरिकेततर्फे येत्या २०२४ चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास , जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून मॅप  तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या ५१ व्या ल्यूनर प्लॅनेटरी  सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.तुपे म्हणाले,चंद्राच्या डिजिटल मॅपमध्ये चंद्राच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी विविध रंग वापरण्यात आले आहेत.त्यावरून चंद्राच्या जन्माच्यावेळी त्यावर असणारी माती आणि नंतरच्या कालावधीमध्ये बदलत गेलेले चंद्राचे स्वरूप याबाबतची माहिती विविध रंगांच्या आधारे डिजिटल मॅप मध्ये दिली आहे. या डिजिटल मॅपच्या माध्यमातून चंद्रावर कोणत्या ठिकाणी उतरावे, चंद्रावरील कोणत्या ठिकाणी कोणता धातू सापडू शकतो हे समजू शकणार आहे. त्यामुळे पुढील चांद्रयान मोहिमा राबविण्यासाठी हा डिजिटल मॅप उपयुक्त ठरणार आहे.  चंद्रावर पाऊस, वारा अशा कुठल्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे सध्या तयार करण्यात आलेला मॅप हा कायमस्वरूपी वापरला जाणार आहे. भारताला सुद्धा या मॅप च्या आधारे  आपली चांद्रयान मोहीम यशस्वीरीत्या राबविता येऊ शकते,असेही तुपे यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेChandrayaan 2चांद्रयान-2scienceविज्ञानAstrologyफलज्योतिषResearchसंशोधन