शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

घरात ‘नो गॅझेट झोन’ बनवा; रात्री जेवताना मोबाइल नको, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:48 IST

Narendra Modi: पालकांनी आपल्या घरामध्ये ‘नो गॅझेट झोन’ आणि ‘रात्रीच्या जेवणादरम्यान मोबाइल वापरायचा नाही’ या प्रकारचे काही नियम करावेत. तसेच घरातील सदस्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सर्व फोन्सचे पासवर्ड प्रत्येकाशी शेअर करावेत.

नवी दिल्ली -  पालकांनी आपल्या घरामध्ये ‘नो गॅझेट झोन’ आणि ‘रात्रीच्या जेवणादरम्यान मोबाइल वापरायचा नाही’ या प्रकारचे काही नियम करावेत. तसेच घरातील सदस्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सर्व फोन्सचे पासवर्ड प्रत्येकाशी शेअर करावेत. यामुळे अनेक वाईट गोष्टी थांबतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.

भारत मंडपम येथे आयोजित सातव्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाला ओझे समजू नये, परंतु त्याचा वापर एखाद्याच्या फायद्यासाठी कसा करायचा हे शिकणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना ॲपद्वारे ‘स्क्रीन टाइम’वर लक्ष ठेवण्याचा सल्लाही दिला.

२.२६ कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

३१.२४ लाख विद्यार्थी आणि ५.६० लाख शिक्षक आणि १.९५ लाख पालकांनी गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

इतर मुलांची उदाहरणे देऊ नकाबरेच पालक आपल्या मुलांना इतर मुलांची उदाहरणे देत असतात. पालकांनी या गोष्टी करणे टाळावे. आम्ही हेदेखील पाहिले आहे की ज्या पालकांना त्यांच्या आयुष्यात फारसे यश मिळाले नाही, त्यांच्या यशाबद्दल जगाला सांगण्यासारखे काही नाही, ते त्यांच्या मुलांचे प्रगतिपुस्तक त्यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ बनवतात, हे चांगले नही. कोणीही भेटला की मग ते त्याला त्यांच्या मुलांची गोष्ट सांगतील, असेही मोदी म्हणाले. 

प्रगतिपुस्तक ‘व्हिजिटिंग कार्ड’ मानू नयेमुलांना दडपणाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्यामध्ये लवचिकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांना तोंड द्यावे. मुलाचे प्रगतिपुस्तक स्वतःचे भेटकार्ड (व्हिजिटिंग कार्ड) मानू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिला. 

बटन बंद केले की, तणाव नाहीसा झाला असे करू शकत नाही. विद्यार्थ्याने दबाव, तणाव सहन करण्यास सक्षम बनले पाहिजे. तणावासाठी स्वतःला तयार केले पाहिजे.  - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मी ३० सेकंदांत गाढ झोपी जातोमी झोपल्यानंतर ३० सेकंदांत गाढ झोपेत जाण्याचा नित्यक्रम पाळला आहे. जेव्हा तुम्ही जागे होता त्यावेळी पूर्णपणे जागे होणे आणि झोपताना गाढ झोप घेणे हे मी संतुलन राखले आहे. विद्यार्थ्यांनी ‘स्क्रीन टाइम’पासून सावध रहावे, त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो, असे पंतप्रधान म्हणाले. 

काय आहे मोदीमंत्र?nनेहमी अधिक हुशार आणि कठोर परिश्रम करणारे मित्र बनवा.nएका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नये, कारण ते त्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते.nतयारीदरम्यान लहान ध्येय ठेवा आणि हळूहळू तुमची कामगिरी सुधारा, अशाप्रकारे तुम्ही परीक्षेपूर्वी पूर्णपणे तयार व्हाल.nअनेक विद्यार्थी मोबाइल फोन वापरतात आणि काही तर तासन्तास वापरता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या झोपेचा वेळ रिल्स पाहण्यासाठी वापरू नये.nमोबाइल वापरण्यासाठीदेखील रिचार्ज आवश्यक आहे, त्याचप्रमाणे, आपल्या शरीरालादेखील रिचार्ज करणे आवश्यक.nमोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या या युगात परीक्षांसाठी लिहिण्याचा सराव आवश्यक. लेखनाचा सराव करण्यासाठी किमान ५० टक्के वेळ द्या.nमित्रांशी नव्हे तर स्वत:शी स्पर्धा करा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षा