शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:01 IST

३ वर्षापूर्वी देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी एनडीएकडून जगदीप धनखड रिंगणात होते.

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला. ते भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. राधाकृष्णन यांच्याविरोधात विरोधी इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी मैदानात उतरले होते. परंतु १५२ मतांनी त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. निवडणुकीत १५ मते बाद करण्यात आली. जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले. त्यानंतर या पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली. 

२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काय घडले?

३ वर्षापूर्वी देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी एनडीएकडून जगदीप धनखड रिंगणात होते. धनखड यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत एकूण ७२५ मते पडली होती. त्यातील जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर विरोधी पक्षातील मार्गारेट अल्वा यांना १८२ मते पडली होती. या निवडणुकीतही १५ मते बाद झाली होती. धनखड आणि अल्वा यांच्यातील विजयाचे अंतर ३४६ मतांचे होते. 

विरोधी पक्षाला झटका

यंदाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला झटका मिळाल्याचे बोलले जाते. विरोधकांना कमीत कमी ३२० हून अधिक मते मिळणे अपेक्षित होते परंतु रेड्डी यांना ३०० मते मिळाली. संध्याकाळी ५ वाजता मतदान संपल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विरोधकांची एकजूट असून ३१५ खासदारांनी मतदान केले असं सांगितले होते. 

दरम्यान, २०१४ पासून देशात भाजपाची सत्ता आहे. या काळात २०१७, २०२२ आणि आता २०२५ मध्ये उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक पार पडली. त्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना ५१६ मते पडली होती तर विरोधी उमेदवाराला २४४ मते होती. २०२२ मध्ये धनखड यांना ५२८ मते मिळाली ते निवडून आले आणि आता २०२५ मध्ये ४५२ मते मिळत सी.पी राधाकृष्णन विजयी झाले. परंतु विरोधकांची मते गेल्यावेळच्या तुलनेत १८२ वरून यंदा ३०० इतकी झाली आहेत. 

टॅग्स :Parliamentसंसदjagdeep dhankharजगदीप धनखडBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी