शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार? CSIR प्रमुखांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 5:04 PM

Covid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. विशेषत: केरळ, तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा आलेख ज्या प्रकारे वर जात आहे, ते पाहून असे वाटते की ही कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) आहे. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट खरंच आली आहे का? असा सवाल उपस्थित होते आहे. यावर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) मोठा खुलासा केला आहे. सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर सी मांडे म्हणाले, कोरोना व्हायरची तिसरी लाट येणार हे निश्चित आहे, पण ती कधी येईल आणि लक्षणे काय असतील याचा अंदाज बांधता येत नाही. (next covid-19 wave definite but when how not known csir chief)

टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. तसेच, केरळमधील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे डेल्टा प्लस व्हेरिएंट जास्त चिंतेचा विषय नाही, असेही डॉ शेखर सी मांडे यांनी सांगितले.

डॉ शेखर सी मांडे म्हणाले, कोरोना व्हायरससाठी डेल्टा व्हेरिएंट वाईट आहे, परंतु डेल्टा प्लसबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेने कोरोनाची पुढील लाट पाहिली आहे. आपल्याला संरक्षित दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. पुढची लाट येण्याची शक्यता आहे, पण कसे आणि केव्हा ते अजून माहीत नाही. या व्हायरसचा नवीन म्यूटेंट किंवा कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करण्यात केले नाही, तिसऱ्या लाटेचे कारण ठरु शकेल.

सर्वांनी कोरोनाची लस घ्यावीकोरोनाची लस सामान्य लोकांवर पूर्णपणे काम करत आहे, यासाठी वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. सध्या कोरोनाची लस तिसऱ्या लाटेचे एकमेव शस्त्र मानले जात आहे. सर्व लोकांनी शक्य तितक्या लवकर लस घ्यावी, जेणेकरून तिसऱ्या लाटेचा सामना करणे सोपे होईल. लसीसंदर्भात कोरोना व्हायरसची जीनोमिक पाळत ठेवणे पुढील तीन वर्षे सुरू राहील, असे डॉ शेखर सी मांडे यांनी सांगितले.

WHO च्या आधी कोविड -19 वर चर्चा केली होतीजागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  महामारी घोषित करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी आम्ही कोविड -19 वर चर्चा सुरू केली आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. सीएसआयआरच्या 37 प्रयोगशाळांमधील तज्ज्ञ सहभागी होते. आम्ही जीनोमिक, सीरो आणि सीवेज परिक्षण केले होते. आम्ही ड्राय स्वॅब पद्धतीसह डायग्नोस्टिक किट आणि चाचणी पद्धती विकसित केल्या आहेत, असेही डॉ शेखर सी मांडे म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य