Corona Vaccine : लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् दर्शन घ्या; कोरोना लस घेतलेल्या भाविकांनाच मिळणार 'या' मंदिरात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:03 IST2021-06-24T16:53:35+5:302021-06-24T17:03:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

Corona Vaccine : लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् दर्शन घ्या; कोरोना लस घेतलेल्या भाविकांनाच मिळणार 'या' मंदिरात प्रवेश
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये असं एक मंदिर आहे जिथे मंदिरात प्रवेश करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र गरजेचं आहे. इंदूरचं प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र आता कोरोना काळात या मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र सोबत न्यावं लागणार आहे.
मंदिर परिसरात दाखल होणाऱ्या भाविकांची कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंदिराचे पुजारी अशोक भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाद्वारे मंदिर परिसरातच लसीकरण केंद्रही सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, दर्शनासाठी येणारे भाविक लस घेऊन तत्काळ प्रमाणपत्रंही मिळवू शकतात.
Corona Vaccine : बापरे! IAS अधिकारी असल्याचं खोटं सांगून महिला खासदाराला दिली बनावट कोरोना लस #CoronaVirusUpdates#coronavirus#CoronaVaccine#coronavaccination#TMC#MimiChakrabortyhttps://t.co/wRmxUqFS7U
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2021
मंदिराच्या या नियमांना भाविकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय याचं एक उदाहरणही पुजाऱ्यांनी दिलं आहे. शेजारच्या देवास शहरातील एक नवविवाहीत जोडपं खजराना मंदिरात गणेश दर्शनासाठी आलं होतं. मात्र वर-वधू दोघांनीही कोरोना लस घेतली नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना मंदिराच्या नियमांविषयी आणि मंदिर परिसरातील उपलब्ध लसीकरण व्यवस्थेविषयी माहिती दिली तेव्हा त्यांनी आनंदाने लस घेतली. त्यानंतर त्यांनी गणेश दर्शनही केलं, असं अशोक भट्ट यांनी म्हटलं आहे. मंदिर परिसरातील केंद्रात एकत्र लस घेताना या वर-वधुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'हा' आहे उपाय#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/U9Encjx8T6
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
TMC खासदार अडकली फेक लसीकरणाच्या जाळ्यात, स्वत: घेतली लस अन्...; असा झाला धक्कादायक खुलासा
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) बनावट लसीकरणाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्वत: IAS अधिकारी असल्याचं सांगून या व्यक्तीने चक्रवर्ती य़ांना बनावट लस दिली आहे. टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एका लसीकरण शिबिरासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी सांगण्यात आलं होतं की, कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जॉईंट कमिश्नरच्यावतीने ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबीर (Corona Vaccine) आयोजित करण्यात आलं आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगून त्या व्यक्तीने मला कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मी तेथे गेले आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लसीकरण केलं."
"लसी जमा केल्या, इव्हेंटसाठी एका दिवसात लसी दिल्या आणि पुढच्या दिवशी लसीकरण कमी झालं"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल#coronavirus#CoronaVaccine#priyankagandhi#Congress#ModiGovt#Politicshttps://t.co/hY182A9oeMpic.twitter.com/joiDhwv51Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 23, 2021