शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:01 AM

Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.

ठळक मुद्देगेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.

Coronavirus in India, Covid-19, Latest Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ३,७८,७४१ रुगांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४,१०६ रुगांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. तर दिल्ली आणि महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आतापर्यंत देशात एकूण २,४९,६५,४६३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २,११,७४,०७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत कोरोनामुळे देशात २,७४,३९० रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात ३५,१६,९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला केंद्र सरकारनं परवानगी दिली. सध्या देशात १८,२९,२६,४६० नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्र