शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 19:42 IST

CoronaVirus News : कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेमुळे (Second Wave) हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचे नवे स्ट्रेन (प्रकार) आढळून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे. यातच लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकने मोठा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. (covaxin effective against coronas strains found in britain and india, bharat biotech)

भारतातील B.1.617 आणि ब्रिटनमधील B.1.1.7 या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. तसेच, कोव्हॅक्सिनचा वापर B.1.1.7 स्ट्रेन आणि व्हॅक्सिन स्ट्रेन (D614G)च्या न्यूट्रिलायझेशनध्ये काही बदल दिसून आला नसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केले आहे.

2 ते 18 वयोगटावर कोव्हॅक्सिनची चाचणीड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोव्हॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे.

(बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण)

देशात तीन लसींचे लसीकरण देशात सध्या दोन लसींचे लसीकरण सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूटद्वारे तयार केलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लसीचा यामध्ये समावेश आहे. तर रशियाद्वारे निर्मित स्पुटनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ही लस लोकांना दिली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात 18 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत