शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश : जर्ब-ए-अज्बच्या वर्षपूर्तीनिमित्त पाक लष्कराचा देशभक्तीपर व्हिडिओ

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

कराची : दहशतवाद्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर राबवत असलेल्या जर्ब - ए - अज्ब मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या जनसंपर्क विभागाने देशभक्तीपर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ चार मिनिटांचा असून दहशतवाद्यांनी शस्त्रे रोखल्यामुळे भेदरून गेलेल्या बालकाच्या दृश्याने त्याचा प्रारंभ होतो. दुसर्‍या दृश्यात दहशतवादी आदिवासींना धमकावताना दिसतात. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक हिंसाचारग्रस्त भागात जाण्यासाठी लष्करी विमाने आणि वाहनांत बसताना दिसतात. शेवटी सैनिक आणि दहशतवाद्यांत लढाई होऊन सैनिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करतात, असे दाखविण्यात आले असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. हा व्हिडिओ लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक असिम बज्वा यांची कल्पना असून लोकांत पुन्हा विश्वास निर्माण करून राष्ट्र सुरक्षित असल्याचा संदेश देण्याच्या हेतूने

कराची : दहशतवाद्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर राबवत असलेल्या जर्ब - ए - अज्ब मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या जनसंपर्क विभागाने देशभक्तीपर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ चार मिनिटांचा असून दहशतवाद्यांनी शस्त्रे रोखल्यामुळे भेदरून गेलेल्या बालकाच्या दृश्याने त्याचा प्रारंभ होतो. दुसर्‍या दृश्यात दहशतवादी आदिवासींना धमकावताना दिसतात. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक हिंसाचारग्रस्त भागात जाण्यासाठी लष्करी विमाने आणि वाहनांत बसताना दिसतात. शेवटी सैनिक आणि दहशतवाद्यांत लढाई होऊन सैनिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करतात, असे दाखविण्यात आले असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. हा व्हिडिओ लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक असिम बज्वा यांची कल्पना असून लोकांत पुन्हा विश्वास निर्माण करून राष्ट्र सुरक्षित असल्याचा संदेश देण्याच्या हेतूने तो तयार करण्यात आला आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. बज्वा यांनी जर्ब ए अब्ज मोहिमेबाबत केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी सुरू झालेल्या या मोहिमेने २,७६३ संशयित दहशतवाद्यांना ठार करून दहशतवाद्यांचे ८३७ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. २५३ टन स्फोटके हाती लागलेल्या या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी लष्कराचे ३५० सैनिक मृत्युमुखी पडले.