शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

देश परदेश-सुधारीत दलित कायदा

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

दलित अत्याचार प्रतिबंधक

दलित अत्याचार प्रतिबंधक
कायद्यातील दुरुस्ती अधिसूचित
नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ नुसार पीडितांना गतीने न्याय मिळावा यासाठी चार महिन्यांपूर्वी संसदेने त्याच्या तरतुदी अधिक कडक केल्या होत्या. या सुधारणांनुसार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने हे बदल अमलात येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी नियम अधिसूचित केले.
राज्यसभेने संमती दिल्यानंतर या १९८९ च्या कायद्यातील दुरुस्तीला संसदेने २१ डिसेंबर २०१५ रोजी मान्यता दिली. त्याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये लोकसभेने या दुरुस्त्या मान्य केल्या होत्या. या दुरुस्तीचा उद्देश हा न्यायाची प्रक्रिया गतिमान करणे, पीडितांना वेगाने आर्थिक मदत मिळावी हा आहे. विशेषत: अत्याचारांचा बळी महिला असल्यास विशेष संवेदनशीलता दाखविली जावी असाही त्यामागे उद्देश आहे. यासंदर्भात सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर यांच्या कल्पनेतील समतेचा आणि न्यायाचा समाजनिर्मितीच्या दिशेने हे नियम टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अत्याचाराच्या स्वरूपानुसार दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीत सध्याच्या ७५ हजार ते ७,५०,००० व ८५ हजार ते ८,२५,००० दरम्यान कायद्यातील नव्या दुरुस्तीनुसार वाढ झाली आहे. इतर महत्त्वाच्या तरतुदींनुसार चौकशी आणि आरोपपत्र ६० दिवसांत दाखल झाले पाहिजे, रोख किंवा अन्य स्वरूपातील मदत पीडित, त्याचे कुटुंबीय किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना सात दिवसांत मिळाली पाहिजे. बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणात आर्थिक मदतीची तरतूद या कायद्यात प्रथमच करण्यात आली आहे.
------------