शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:36 IST

'भाजपा खासदार असल्यानं अनेक विषयांवर बोलता यायचं नाही'

इंदूर: राज्यात भाजपाचं सरकार असताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे, असं महाजन म्हणाल्या. राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपाचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत, असं मला कायम वाटायचं. त्यावेळी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्द उचलायचे, असं महाजन यांनी सांगितलं. महाजन यांनी लोकसभेत आठ वेळा इंदूरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेते जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट यांनी विनम्रपणे निवेदन द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यामध्ये लक्ष घालतील, असं आश्वासन मी काँग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केलं. इंदूरचा विकास हाच ध्यास असल्यानं पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवलं, असं महाजन यांनी सांगितलं. भाजपाचे शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या कालावधीत मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला पराभव पत्करावा लागला. यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं. सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुमित्रा महाजन यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शंकर लालवाणी यांनी इंदूरमधून निवडणूक लढवत लोकसभा गाठली.  

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनBJPभाजपाcongressकाँग्रेस