शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Corporate Fund: भाजप झाला धनी, कार्पोरेट कंपन्यांकडून 1 वर्षात 720 कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:37 IST

कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या निधींपैकी सर्वाधिक निधी भाजपला देण्यात आला आहे

नवी दिल्ली - राजकीय पक्षांना आर्थिक रसद पुरविण्याचं काम अनेकदा कॉर्पोरेट कंपन्यांकडून केलं जातं. या कंपन्यांकडून पक्षाच्या विकासासाठी पार्टी फंड देण्यात येतो. त्यातून, राजकीय पक्ष आपले आर्थिक गणित आखून पक्ष संघटना वाढीसाठी जोर लावत असतात. विशेष म्हणजे या पक्षांना आलेल्या निधीचा हिशोबही द्यावा लागतो. त्यानुसार, कॉर्पोरेट कंपन्यांकडून गत 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांना तब्बल 921.95 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या निधींपैकी सर्वाधिक निधी भाजपला देण्यात आला आहे. त्यानुसार, भाजपला 720.407 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सने (सीपीएम) कॉर्पोरेट कंपन्यांकडून एक रुपयाचीही निधी घेतला नाही. एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. एडीआरच्या अहवालानुसार, 2017-18 आणि 18-19 या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यांकडून देशातील राष्ट्रीय पक्षांना देण्यात आलेल्या निधींमध्ये 109 टक्क्यांची वाढ झाली आहे. एडीआरने 5 राजकीय पक्षांचे विवरण दिले आहे. त्यामध्ये, भाजप, काँग्रेस, एनसीपी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स यांचा समावेश आहे. त्यामध्ये, फ्रुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टने 2019-20 मध्ये भाजप आणि काँग्रेसला सर्वाधिक डोनेशन (निधी) दिला. ट्रस्टने एकाच वर्षात या दोन्ही पक्षांना 38 वेळा दान केलं आहे. त्याची एकूण रक्कम 247.75 कोटी एवढी आहे. कंपनीने भाजपला 216.75 कोटी रुपये दिले असून काँग्रेसला 31 कोटी रुपये मिळाले आहेत. 

बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्राायव्हेट लिमिटेड ने 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी दिला. प्रूडेंट ही सर्वात श्रीमंत निवडणूक ट्रस्ट आहे, ही कंपनी 2013-14 पासून भाजपाला सर्वाधिक फंड देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, 2012-13 पासून 2019-20 पर्यंत, राष्ट्रीय पक्षांना 2019-20 (17व्या लोकसभेच्या दरम्यान) सर्वाधिक 921.95 कोटींचा कॉर्पोरेट निधी मिळाला. त्यानंतर, 2018-19 मध्ये 881.26 कोटी आणि 2014-15 (16व्या लोकसभा निवडणुकांवेळी) 573.18 करोड़ रुपये फंड मिळाला होता. 

2019-20 मध्ये देण्यात आलेलं कॉर्पोरेट डोनेशन 2012-13 आणि 2019-20 च्या कालावधीतील एकूण डोनेशनच्या 24.62 टक्के एवढं आहे. सन 2012-13 आणि 2019-20 दरम्यान, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संघटनांकडून राष्ट्रीय पक्षांना देण्यात आलेल्या डोनेशमध्ये 1,024 टक्क्यांची वाढ झाली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस