नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे वैद्यकीय जगतासमोर रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना या आजाराच्या संसर्गाचा मोठा धोका असतो. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे डॉक्टर आणि अन्य वैद्यकी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट काढल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेले आणि घामाने डबडबलेल्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. मात्र पीपीई किटमुळे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे.संपूर्णपणे सीलबंद असणाऱ्या पीपीई किटमध्ये एसी फिट करण्याची अजब कल्पना एका अवलिया संशोधकाने शोधून काढली आहे. जबलपूरमधील एका युवकाने ही एअरकंडिशन पीपीई किट तयार करण्याचा कारनामा केला आहे. ही पीपीई किट परिधान केल्यानंतर कोरोना वॉरियर्स आरामात आपले काम करू शकतील. ही पीपीई किट सुमारे पाच ते सहा तास थंड राहू शकते, असा दावा या तरुणाने केला आहे. तसेच ही पीपीई किट पेटंट मिळवण्यासाठी पाठवण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ न्यूज २४ ने प्रसारित केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी