शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Coronavirus : तब्बल 19 वेळा 'तिचा' कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, डॉक्टरही झाले हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 16:55 IST

Coronavirus : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1383 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

तिरुवनंतपूरम - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. तर 640 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 474 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3870 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1383 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे. मात्र याच दरम्यान एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका महिलेच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा तब्बल 19 वेळा पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनसारखे खबरदारीचे उपाय करून देश कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे. तसेच देशात उपचारानंतर काहींना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. पण केरळमधील एका घटनेमुळे डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. केरळच्या पथानामथिट्टामधील एक महिलेला कोरोनाची लागण झाली असून ती तब्बल 42 दिवस रुग्णालयात आहे. तसेच सलग 19 वेळा या  महिलेच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इटलीवरुन आलेल्या एका कुटुंबाच्या संपर्कात आल्यामुळे 62 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत तिच्या 19 चाचण्या करण्यात आल्या असून या सर्व चाचण्यांमध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणेही आढळलेली नाहीत. तसेच कोणताही आजार नाही. मात्र जर महिलेचा आणखी एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा विचार सुरू आहे.'

कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 25 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 19 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं

बापरे! 'ती' निघाली 'तो' अन् बसला तब्बल 91 हजारांचा फटका

Coronavirus : ...म्हणून 'या' दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन' 

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळIndiaभारतDeathमृत्यू