Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:37 PM2020-04-22T14:37:02+5:302020-04-22T14:45:29+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

coronavirus hydroxychloroquine shows no benefit possible harm in patients study SSS | Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं

Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं

Next

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 640 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 

संपूर्ण देशासाठी संजीवनी ठरलेल्या या औषधाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनासाठीच्या उपचारात महत्त्वाचं असणारं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध आता जीवघेणं ठरत असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे. ज्या कोरोनाग्रस्तांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिलं जातं आहे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे सामान्य पद्धतीने उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. 

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ  आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या प्राध्यापकांनी हा अभ्यास केला. यामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमुळे सुरुवातीला रुग्णांची प्रकृती सुधारते मात्र नंतर त्याची तब्येत आणखी बिघडत असल्याचं म्हटलं आहे. तसेच वेटरन हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार 97% कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आलं. त्यापैकी 28% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सामान्य पद्धतीने उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण फक्त 11% आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रान्सने 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' या औषधाचा वापर थांबवला आहे. फ्रान्समधील एका रुग्णालयाने कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर थांबवला. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटर ऑफ नाइसने हा निर्णय घेतला. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयाचे कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. एमाइल फेरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचे काही प्रतिकूल परिणामही समोर आले आहेत. काही रुग्णांसाठी हे औषध धोकादायक ठरत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे फ्रान्सने 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' या औषधाचा वापर थांबवला.

महत्त्वाच्या बातम्या 

बापरे! 'ती' निघाली 'तो' अन् बसला तब्बल 91 हजारांचा फटका

Coronavirus : ...म्हणून 'या' दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन' 

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

Web Title: coronavirus hydroxychloroquine shows no benefit possible harm in patients study SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.